कागदावर केमिकल टाका, नोटा तयार करा? 500ची नोट तयार करणारं 'केमिकल रॅकेट'

Fake ₹500 Currency Notes Made Using: कागदावर केमिकल टाकून नोटा तयार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय... त्यामुळे केमिकल रॅकेटचा हा प्रकार नेमका कुठे घडलाय? 500 रुपयांच्या बनावट नोटा या रॅकेटनं कशा तयार केल्या पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
chemical process used to make fake 500 rupee notes
chemical process used to make fake 500 rupee notessaam tv
Published On

अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या भामट्यांच्या अनेक कहाण्या आपण ऐकल्या असतील. मात्र, आता थेट 500 रुपयांच्या नोटा केमिकलमध्ये टाकून त्या तिप्पट करून देण्याचे अजब आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा मिरा-भाईंदरमधील पोलिसांनी पर्दाफाश केलाय...मीरा भाईंदरच्या काजूपाडा परिसरात काही भामटे 500 रुपयांच्या खऱ्या नोटा केमिकलच्या प्रक्रियेतून तिप्पट करता येतात, असा जादुई दावा करून नागरिकांची फसवणुक करत होते...त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून याप्रकरणाचा डेमो समोर आणलाय...

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतलयं...आरोपींकडून कोणते साहित्य जप्त करण्यात आले...पाहूयात..

500 रुपयांच्या नोटा आणि काळ्या रंगाने रंगवलेल्या बनावट नोटा

केमिकलच्या बाटल्या आणि प्लॅस्टिक पॅकेट्स

नोटा वाळवण्यासाठी लागणारे साहित्य

6 मोबाईल फोन आणि 2 बॅग्ज

एकूण 1 लाख 38 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कष्ट न करता आणि कोणतीही मेहनत न घेता रातोरात

श्रीमंत होण्याच्या शॉर्टकटमुळे अनेकदा सर्वसामान्य नागरिक अशा भामट्यांच्या जाळ्यात अडकतात. मुळात केमिकलद्वारे नोटा तयार करता येणं अशक्य आहे...मात्र तरीही अशा पद्धतीनं हातचलाखी करून सामान्यांना गंडा घालण्यासाठी अशी रॅकेट सर्रास सुरू आहेत. त्यामुळे नोटा तयार करणाऱ्या या केमिकल रॅकेटची पाळमुळं किती खोलवर गेली आहेत याचा तपास करून याच्या मुख्य सुत्रधारांवर कारवाई करणं गरजेचं आहे. मात्र तुम्हीही पैशांसाठी आंधळे होऊन भूलथापांना बळी पडू नका....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com