Deepak Kesarkar On Eknath Shinde: CM एकनाथ शिंदेंबद्दल मंत्री केसरकरांचा आणखी एक गौप्यस्फोट, म्हणाले...

Maharashtra Government: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पद काढून घेण्याचा प्रयत्न झाला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
Deepak Kesarkar On Eknath Shinde
Deepak Kesarkar On Eknath ShindeSaam Tv
Published On

Mumbai News: एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (Shivsena) पक्षात बंड पुकारत 40 आमदारांसह स्वत:चा वेगळा गट तयार केला. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करुन राज्याचे मुख्यमंत्री झाले. यावरुन एकनाथ शिंदे यांच्यावर वारंवार ठाकरे गटाकडून आणि विरोधी पक्षांकडून टीका होत आहे.

अशामध्ये मुख्यमंत्र्यांवर वारंवार टीका करणाऱ्या ठाकरे गटाला राज्याचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर देत पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पद काढून घेण्याचा प्रयत्न झाला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

Deepak Kesarkar On Eknath Shinde
Darshana Pawar Death Case : शेवटचं बोलायचं म्हणून राजगडावर नेलं, अन्... दर्शना पवारच्या हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर

दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. 'भाजपासोबत जाण्याची तुमची इच्छा नव्हती. तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवे होते. राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जाऊन तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरलात.', असा टोला त्यांनी लगावला. तसंच, 'संजय राऊत म्हणाले होते की 40 लोकांचे मुडदे पाडणार. शिंदे साहेबांचा अपमान झाला म्हणून ते शिवसेनेतून बाहेर पडले. मी नामर्दाकडून मरणार नाही मी स्वतः ला संपवणार असा बोलणारा आमचा नेता आहे. 80 टक्के समाजकारण करणारा ते खरा शिवसैनिक आहेत. जनतेने युतीला मतदान दिलं होतं'

Deepak Kesarkar On Eknath Shinde
Pune Fraud Trap News: सॉफ्टवेअर इंजिनिअर अडकला सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात; ७ लाख रुपयांचा गंडा

राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकून करण्यात आलेल्या गद्दार दिनावर देखील केसरकरांनी टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, 'ठाकरे गटाकडून गद्दार दिन केला गेला. शिवसैनिकांनी डोळे उघडले पाहिजेत. तो लाचारी दिन म्हणून साजरा करायला हवा होता. मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही लाचार झालात. म्हणून लाचारी दिन साजरा करायला हवा होता.लोकांच्या जावांशी खेळता भ्रष्ट्राचार करता आणि मोर्चे काढता. यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.' अशी टीका त्यांनी केली.

Deepak Kesarkar On Eknath Shinde
Darshana Pawar Death Case: दर्शना पवार हत्या प्रकरणात मोठी अपडेट, मित्र राहुल हांडोरेला अटक

केसरकरांनी पुढे सांगितले की, 'आम्ही आमचे काम करत राहू. जनता आमच्यावर प्रेम करते. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून मुंबई घडत आहे. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकार करत आहे.' तसंच, 'संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना खर बोलण्याची शिकवणी लावण्याची गरज आहे.' असा टोला त्यांनी लगावला.'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही भावांसारखे आहेत. उपमुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यांचात गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे.', असा आरोप त्यांनी केला आहे.

पोस्टरवरुन सुरु असलेल्या वादावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'औरंगजेबाचे नव्याने प्रेम झाले असेल तर उद्धव ठाकरेंनी तसं सांगावं. आम्ही छ्त्रपतींचे नाव घेऊन राज्य चालवतो. आम्हाला सरदारांना विसरता येणार नाही. बाळासाहेब त्यांना कधीच माफ करणार नाहीत. आम्ही ताठ मानेने शिवसेना चालवतो. तुमच्यापेक्षा जास्त गर्दी आमच्या येथे असते.', असे त्यांनी यावेळी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com