बिल द्या, नाहीतर आत्मदहन; म्हाडा कंत्राटदारांचा संताप, अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

MHADA Contractors Protest Over Pending Bills: म्हाडा रिपेअरिंग बोर्डाच्या कंत्राटदारांची दीड ते दोन वर्षांपासून बिले थकीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. थकीत बिले तातडीने देण्याची मागणी करत कंत्राटदारांचे आंदोलन पुकारले आहे.
MHADA contractors
MHADA contractorssaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: म्हाडा रिपेअरिंग बोर्डाकडून करण्यात आलेल्या कामांची दीड ते दोन वर्षांपासून बिले थकीत असल्याच्या आरोपावरून कंत्राटदार आक्रमक झाले आहेत. थकीत बिले तातडीने अदा करण्याच्या मागणीसाठी कंत्राटदारांनी म्हाडा प्रशासनाविरोधात निदर्शने केली. दरम्यान, थकीत बिलांची मागणी करणारे कंत्राटदार गणेश भुसाटे यांना म्हाडा अधिकाऱ्यांनी गुंड पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

MHADA contractors
३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

या धमकीप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली आहे. मात्र, म्हाडा अधिकारी तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संबंधित कंत्राटदार यांनी न्यायालयात धाव घेतली असून संबंधित अधिकारी आणि धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा नोंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आबासाहेब पतंगे यांनी म्हाडा प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. थकीत कामाची बिले एका महिन्याच्या आत अदा न केल्यास म्हाडाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनादरम्यान कुणाचे बरे-वाईट झाल्यास किंवा आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागल्यास त्याला सर्वस्वी म्हाडा प्रशासन जबाबदार असेल, असेही पतंगे यांनी म्हटले आहे.

MHADA contractors
महाराष्ट्रात पुन्हा कंत्राटदाराची आत्महत्या; वर्षभरात 3 कंत्राटदारांनी संपवलं जीवन

दीड ते दोन वर्षांपासून बिले रखडल्याने कंत्राटदारांवर आर्थिक संकट ओढावल्याचा दावा करण्यात येत आहे. कामे करूनही त्यांची देयके वेळेत मिळत नसल्याने कंत्राटदारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आता थकीत बिलांच्या प्रश्नावरून म्हाडा प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.

MHADA contractors
20 वर्ष होऊनही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प होईना! नागरिक संतप्त, शाह हाऊसकॉनला हटवण्याची मागणी

दरम्यान, या आरोपांबाबत म्हाडाची अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com