20 वर्ष होऊनही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प होईना! नागरिक संतप्त, शाह हाऊसकॉनला हटवण्याची मागणी

Malad SRA Redevelopment : मुंबईतील मालाडच्या खोत डोंगरी परिसरातील एसआरए प्रकल्प २० वर्षांपासून रखडल्याने रहिवासी संतप्त आहेत. शाह हाऊसकॉनला प्रकल्पातून हटवण्याची मागणी करण्यात येत आहे.
Malad SRA Redevelopment :
Malad SRA Redevelopment :saam tv
Published On
Summary
  • एसआरए पुनर्विकास प्रकल्प २० वर्षांपासून रखडल्याचा रहिवाशांचा आरोप

  • प्रकल्पातील पात्र रहिवाशांमध्ये तीव्र संताप

  • २० वर्षांच्या विलंबामुळे पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर पुन्हा प्रश्नचिन्ह

मुंबईतील मालाड येथील खोत डोंगरी परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकास योजना (SRA) २० वर्षांपासून रखडली आहे. यामुळे पात्र रहिवाशांमध्ये संतप्त झालेत. एसआरएच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाह हाऊसकॉन या विकासकाची प्रकल्पातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जातेय.

Malad SRA Redevelopment :
Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास बदलणार! एसी लोकलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वाचा काय आहे प्लान

एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या विशेष बैठकीत नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. येत्या पाच दिवसांत प्रश्न न सुटल्यास विकासकावर निष्कासनाची कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्राधिकरणाकडून देण्यात आल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे.

Malad SRA Redevelopment :
CIDCO Lottery: नवी मुंबईत घ्या फक्त २५ लाखांत घर, सिडकोची प्राईम लोकेशनवर ४७७९ घरांसाठी लॉटरी; कुठे किती घरं?

वर्षानुवर्षे थकीत असलेले घरांचे भाडे, बांधकामाची संथ गती आणि विकासकाकडून होणाऱ्या विलंबामुळे नागरिक आर्थिक व मानसिकदृष्ट्या वैतागले आहेत. बैठकीदरम्यान एका ज्येष्ठ रहिवाशाने सांगितले की, हक्काच्या घराच्या आशेने रहिवाशांनी आपली घरे मोडून विकासकाच्या हाती सोपवली. मात्र अनेक वर्षे मन्सुख शाह यांनी केवळ आश्वासने दिली. पण प्रत्यक्षात कोणतेही ठोस काम केलेले नाहीत. घराचे भाडेही वेळेवर मिळत नसल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत त्यांनी प्राधिकरणासमोर व्यक्त केली.

पात्र भाडेकरूंचे भाडे अनेक महिन्यांपासून थकवणे, घराचा ताबा देण्यासाठी पैशांची मागणी करणे, पुनर्वसन इमारतींमधील घरे बेकायदेशीरपणे बाहेरील व्यक्तींना विकणे आणि गुंडांकरवी सामान्य रहिवाशांना धमकावणे असे अनेक गंभीर आरोप नागरिकांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com