CNG Rates Today : सर्वसामान्यांना महागाईचा फटका! CNG च्या दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार? वाचा

Mumbai CNG Rates Hike Update News : दिवाळीपूर्वी मुंबईकरांना महागाईचा आणखी एक फटका! महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात एक रुपयाची वाढ केली असून १ नोव्हेंबरपासून मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीचा दर ९० रुपये प्रति किलो झाला आहे.
Mumbai CNG Rates Hike News
Mumbai CNG Rates Hike News AI Image
Published On: 
Summary
  • मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीच्या दरात एक रुपयाची वाढ

  • दिवाळीपूर्वी सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका

  • १ नोव्हेंबरपासून सीएनजीसाठी प्रतिकिलो ९० रुपये मोजावे लागणार

  • सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांना याचा फटका

दिवाळीचा सण जवळ आला असताना सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत २० रुपयांनी वाढ झाल्यानंतर आता मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने सीएनजीच्या दरात एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या खिशावर आता अधिकचा भार पडणार आहे.

नवीन दरानुसार, १ नोव्हेंबरपासून मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीचा भाव ९० रुपये प्रति किलो झाला आहे. यापूर्वी सीएनजीसाठी ग्राहकांना ८९ रुपये मोजावे लागत होते. ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांत सीएनजीच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे.

Mumbai CNG Rates Hike News
Bank Update : SBI चं अकाउंट १ नोव्हेंबर पासून बंद होणार, नेमकं काय आहे सत्य?

MGL ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत आहे. या परिस्थितीमुळे नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्या आहेत. तसेच परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या गॅसचा खर्चही वाढला आहे. गॅस खरेदीसाठी कंपनीला अधिक पैसे मोजावे लागत असल्याने दरवाढ करावी लागल्याचे MGL ने स्पष्ट केले आहे.

या दरवाढीचा परिणाम मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे १२.९३ लाख सीएनजी वाहनांवर होणार आहे. यामध्ये रिक्षा, टॅक्सी, खासगी कार तसेच सरकारी आणि महापालिकेच्या बसचा समावेश आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनाही वाढीव खर्चाचा सामना करावा लागू शकतो. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात सीएनजीच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा एक रुपयाने दर वाढवण्यात आले. आता नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच आणखी एक रुपयाची वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.