Bank Update : SBI चं अकाउंट १ नोव्हेंबर पासून बंद होणार, नेमकं काय आहे सत्य?

SBI Bank Fact Check Update News : १ नोव्हेंबर २०२६ पासून SBI ची सर्व खाती बंद होणार आणि पैसे काढण्यावर बंदी येणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. जाणून घ्या या दाव्यामागील सत्य.
SBI Bank News
SBI Bank News AI Image
Published On: 
Summary
  • १ नोव्हेंबर २०२६ पासून SBI ची सर्व खाती बंद होणार असल्याचा दावा

  • हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं बँकेने दिलं स्पष्टीकरण

  • ग्राहकांना बँक खात्यातून पैसे काढण्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही

  • ग्राहकांचे पैसे सुरक्षित असून बँकेचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू

सोशल मीडियावर सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) संदर्भात एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये १ नोव्हेंबर २०२६ पासून बँकेतील सर्व खाती बंद करण्यात येणार असून ग्राहकांना खात्यातून पैसे काढण्यासही बंदी घालण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. बँकेने अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ३,८९७ ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर आढळल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यासंदर्भात बँकेनेही माहिती दिली होती. ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीशी संबंधित या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

SBI Bank News
Headache : थंडीत अर्ध डोकं दुखतं? असू शकतो 'या' गंभीर आजाराचा संकेत!

या प्रकरणाची चौकशी CERT-In या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत केली जात आहे. मात्र, ग्राहकांच्या खात्यातील पैसे सुरक्षित असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. तसेच बँकेचे सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू आहेत. ग्राहकांची खाती बंद करणे किंवा त्यांना पैसे काढण्यापासून रोखणे, असा कोणताही निर्णय बँकेने घेतलेला नाही.

SBI Bank Fact Check
SBI Bank Fact CheckSaam tv

म्हणजेच काय तर, स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्व खाती १ नोव्हेंबर २०२६ पासून बंद होणार आणि पैसे काढण्यावर बंदी घातली जाणार, हा सोशल मीडियावरील दावा चुकीचा आहे. ग्राहकांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी बँकेच्या अधिकृत माध्यमातून खात्री करून घ्यावी असे आवाहन बँकेमार्फत करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.