Alisha Khedekar
थंडीमध्ये तापमानातील बदल, रक्तवाहिन्यांमधील आकुंचन, निर्जलीकरण किंवा मायग्रेनमुळे डोक्याच्या एका बाजूला वेदना जाणवू शकतात.
डोक्याच्या एका बाजूला ठणकणारी वेदना, मळमळ, उलटी आणि प्रकाश किंवा आवाजाचा त्रास ही मायग्रेनची सामान्य लक्षणे आहेत.
नाक बंद होणे, चेहऱ्यावर दाब जाणवणे आणि कपाळ दुखणे यांसोबत डोकेदुखी होत असल्यास सायनसची समस्या असू शकते.
थंड हवा, झोपेचा अभाव आणि दैनंदिन दिनक्रमातील बदल काही व्यक्तींमध्ये डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास वाढवू शकतात.
डोकेदुखीसोबत ताप, मान आखडणे, गोंधळ, बेशुद्ध पडणे किंवा शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.
पुरेसे पाणी प्या, नियमित झोप घ्या, थंडीपासून संरक्षण करा आणि डोकेदुखी वाढवणारे घटक ओळखून शक्यतो टाळा.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा