Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Alisha Khedekar

गाढ झोप लागणे

काही मुलांना झोपेत लघवीची जाणीव होत नाही. त्यामुळे मूत्राशय भरले तरी त्यांना जाग येत नाही आणि बेड ओला होतो.

Child Health Care | Google

हार्मोन्समधील बदल

रात्री लघवीचे प्रमाण कमी करणाऱ्या हार्मोनचे उत्पादन कमी असल्यास मुलांना रात्री वारंवार लघवी होऊन अंथरूण ओले होण्याची शक्यता असते.

Child Health Care | Google

मानसिक ताणतणाव

घरातील बदल, शाळेचा ताण, नवीन भावंडाचा जन्म किंवा भीती यामुळे आधी कोरडे राहणाऱ्या मुलांमध्ये पुन्हा अंथरूण ओले होण्याची समस्या उद्भवू शकते.

Child Health Care | Google

बद्धकोष्ठतेचा त्रास

मुलांना वारंवार बद्धकोष्ठता होत असल्यास भरलेले आतडे मूत्राशयावर दबाव आणू शकते. त्यामुळे लघवीवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते.

Child Health Care | Google

पाण्याचे प्रमाण

झोपण्यापूर्वी भरपूर पाणी किंवा इतर पेये प्यायल्याने रात्री लघवीचे प्रमाण वाढू शकते. दिवसभर पुरेसे पाणी पिणे मात्र महत्त्वाचे आहे.

Child Health Care | Google

मधुमेहाची शक्यता

मुलाला खूप तहान लागणे, वारंवार लघवी होणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास मधुमेहाची शक्यता लक्षात घेऊन त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Child Health Care | Google

पालकांनी काय करावे?

मुलाला रागावू नका किंवा लाजवू नका. झोपण्यापूर्वी लघवीची सवय लावा. समस्या कायम राहिल्यास बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Child Health Care | Google

NEXT :  रात्रीचे जेवण आणि झोपण्यामध्ये किती अंतर असावे?

Healthy Dinner Tips Eating BetterSleep | AI Image
येथे क्लिक करा