Navi Mumbai JNPA Port News : देशातील सर्वात मोठं कंटेनर बंदर असलेल्या JNPA बंदरात गेल्या 15 दिवसांपासून लाखो कंटेनर्स अडकून पडलेत. नेमकं कशामुळे हे झालंय? याचा सर्वाधिक फटका कुणाला बसलाय? पाहूयात यावरचा एक रिपोर्ट...
आखातातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात आता नवं संकट निर्माण झालंय. एकीकडे, देशात इंधनटंचाई असताना आता देशात येणारा मालही बंदरांवरच अडकलाय. त्यामुळे आयातदार मोठ्या अडचणीत सापडले आहेत. जागतिक पातळीवर जहाजांचे मार्ग बदलल्यामुळे आणि वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे भारतातील पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात मोठं कंटेनर बंदर असलेल्या जेएनपीएवर गेल्या 15 दिवसांपासून हजारो कंटेनर अडकून पडले आहेत. त्यामुळे आयातदार कंपन्यांना लाखो रुपयांचं भाडं भरावं लागतंय. कंटेनर अडकल्यामुळे नेमकी काय समस्या निर्माण झालीये पाहूयात...
JNPA बंदरात लाखो कंटेनर अडकले
बंदरातील कंटेनर साठा 67 टक्क्यांपर्यंत पोहोचला; माल बाहेर काढणं कठीण
48 तासांत कंटेनर बाहेर न आल्यास अव्वाच्या सव्वा शुल्क आकारलं जातंय
JNPAनं हात झटकले, चालक मूळ गावी गेल्यानं मनुष्यबळाची टंचाई असल्याचं कारण
एकापाठोपाठ एक जहाज लागत असल्यानं बंदराच्या अंतर्गत मार्गांवर वाहनांच्या रांगा
कस्टम आयुक्तांनी हस्तक्षेप करून कोंडी फुटत नाही तोपर्यंत शुल्क माफ करण्याची मागणी
जेएनपीटी बंदरातून आयात-निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत असून कामगार आणि ड्रायव्हर्सच्या कमतरतेमुळे हजारो कंटेनर्स अडकलेत.
जेएनपीएनं एक प्रसिद्धी पत्रक जारी करून आपले हात झटकण्याचा प्रयत्न केलाय. बंदरातील पाचही टर्मिनल सुरळीत सुरू असून आता कोणतीही कोंडी नसल्याचा दावा केलाय. जेएनपीएच्या मते खरी अडचण कंटेनर फ्रेस्ट स्टेशन्स आणि कस्टम ब्रोकर्सनी पुरवलेल्या ट्रेलर आणि चालकांच्या टंचाईमुळे निर्माण झालीय. मात्र याचा फटका आयातदारांना बसतोय.
ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.