Mango Rate Hike: अक्षय्य तृतीयेला आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; किंमत वाचून धडकी भरेल

Mango Price Hike on Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेआधी सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणारी बातमी समोर आली आहे. यंदा आंब्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. किंमती ३० ते ४० टक्क्यांनी महागल्या आहेत.
Mango Price Hike
Mango Price HikeSaam Tv
Published On
Summary

अक्षय्य तृतीयेआधी आंबा महागला

आंब्याच्या दरात ३० ते ४० टक्क्यांची वाढ

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

अक्षय्य तृतीया हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घराघरात गोडाधोडाचे पदार्थ बनवतात. अक्षय्य तृतीयेपासूनच आंब्याच्या सीझनला सुरुवात होते, असं म्हणायला हरकत नाही. अनेक घरांमध्ये आमरस बनवला जातो. दरम्यान, आता आंब्याचे दर गगनाला भिडले आहेत. पुण्यातील मार्केटयार्डच्या इतिहासात प्रथमच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याला सर्वाधिक दर मिळाले आहेत.

Mango Price Hike
Mango Juice: तुम्ही खाताय आमरस की विष? तुमच्या मँगो ज्युसमध्ये केमिकल्स? 32 टन भेसळयुक्त मँगो प्लप जप्त

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याचे दर २० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे. अक्षय्य तृतीयेला अनेकजण आंबे खरेदी करतात. त्यामुळेच हे दर वाढले असावेत.आंब्याचे दर प्रति डझन ८०० ते १५०० रुपये आहेत. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

दर वर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ५० टक्क्यांनी मार्केटयार्ड गुलटेकडी घाऊक आवक फळ बाजारात कमी झाले आहेत. त्यामुळे भाववाढ झाल्याचे सांगितले जात आहे. घाऊक बाजारात सध्या पाच ते सात डझन (कच्च्या) आंब्यांचे दर तीन हजार ते सहा हजार आहेत.तर तयार आंबा पाच ते सात डझन आंब्यांची पेटी ३ हजार ५०० ते ६ हजार ५०० रुपयांना विक्री होत आहे.

सध्या दिवसाला सात ते आठ हजार पेट्यांची आवक होत आहे. दरवर्षीच्या तुलनेत ही आवक ३० ते ३५ हजार पेट्यांपर्यंत होणे अपेक्षित होते.मात्र,सध्या ती आवक केवळ ७ ते ८ हजार पेटीवर आली आहे.मागणीदेखील वाढली आहे.मात्र आंबे उपलब्ध नसल्याने अक्षय तृतीयेलाच आंब्यावर परिणाम झाला आहे.

Mango Price Hike
Akshaya Tritiya 2026: सोनं परवडत नाही? अक्षय तृतीयेला घरी आणा 'या' ३ गोष्टी; वर्षभर राहील सुख-समृद्धी!

हवामानातील बदलांमुळे यंदा हापूस आंब्यांची आवक घटली आहे.अक्षय तृतीयेला बाजारात आंब्याचा तुटवडा आहे. अक्षय तृतीयेला आंबा खाण्याची आणि देवाला नैवेद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे.मात्र यंदा ही परंपरा खिशाला कात्री लावणारी ठरणार आहे.

Mango Price Hike
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला महिलांनी नेसा पिवळ्या रंगाची साडी, लेटेस्ट ट्रेडिंग डिझाईन्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com