
महाकुंभमेळ्यात अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावर बसवण्यावरून मोठा वाद उफाळून झाला. अखेर किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी दास यांनी ममताची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी केली. इतकच नाही तर ममताला दीक्षा देणाऱ्या किन्नर आखाड्याच्या लक्ष्मी नारायण त्रिपाठींनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवलं. मात्र हा वाद काही केल्यानं संपायला तयार नाही.
कारण ममताने 10 कोटी रुपये देऊन महामंडलेश्वर पद मिळवल्याचा आरोप होतोय. ममताने मात्र आपलं बँक अकाऊंट सिल असून पैसे नसल्याचं म्हटलंय. टॉपलेस फोटो शूट आणि नंतर ड्रग्ज प्रकरणामुळे बॉलीवुडमध्ये असतानाही ममता वादग्रस्त होती. 2013 मध्ये ममताने हिंदी चित्रपटसृष्टी सोडून ड्रग माफिया विकी गोस्वामीसोबत दुबईत लग्न केल्याचा आरोप आहे.
हा तोच ड्रग माफिया आहे, ज्याला दुबईत ड्रग्ज तस्करीप्रकरणी 12 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. आता संन्यास घेतल्यानंतरही वाद तिची पाठ सोडायला तयार नाही. महामंडलेश्वर पदावरून हटवलं असलं तरी महाकुंभमेळा संपेपर्यंत तरी ममताची वादांपासून सुटका नाही हेच दिसतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.