Kalyan News : 'घरमालकांनो भाडेकरूंची माहिती द्या, अन्यथा...'; पोलिसांचा इशारा, काय आहे नेमकं कारण?

Kalyan Latest News : कल्याण पोलिसांनी घरमालकांना मोठा इशारा दिला आहे. पोलिसांनी घरमालकांनी भाडेकरूंची माहिती देण्यास सांगितली आहे. एखाद्या घरात नकळतपणे बांगलादेशी नागरिक आढळला तर घरमालकावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
kalyan News in Marathi
kalyan News Saam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण : कल्याण डोंबिवलीमधील पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. बांगलादेशी नागरिक ग्रामीण परिसरासह शहरी भागातील चाळ परिसरात भाड्याने घर घेऊन राहत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ग्रामीण परिसरातील चाळमालक आणि घरमालकांची बैठक घेतली आहे. या बैठकीत घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्यात यावी. एखादा भाडेकरू बांगलादेशी असल्याचे लक्षात येताच तत्काळ याबाबत पोलिसांचे संपर्क साधावा. अन्यथा भाड्याच्या घरांमध्ये बांगलादेशी नागरिक किंवा देशासाठी घातक कृत्य करणारा कोणी आढळला तर त्या घरमालकांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराच पोलिसांनी दिला आहे.

kalyan News in Marathi
Kalyan News : बांगलादेशी घुसखोरांविरोधात पोलीस अॅक्शनमोडमध्ये; हॉटेल व्यावसायिक, बार मालकांना दिला कडक इशारा

बेकायदेशीररित्या भारतात घुसखोरी करून संपूर्ण देशभरात बांगलादेशी नागरिक आपले बस्तान मांडत आहेत. या बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. कल्याण डोंबिवलीत बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. हे बांगलादेशी नागरिक हॉटेल, बार, लॉजिंग बोर्डिंग, बांधकाम साइट्स, लेबर कॉन्ट्रॅक्टर काय काम करत असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी संबंधितांना नोटीसा पाठवून कामगारांची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश दिलेत.

kalyan News in Marathi
Kalyan : सुभाष मैदानात इनडोअर गेम स्टेडियमला विरोध; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या चर्चेदरम्यान खेळाडूंसह मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ

तर त्यानंतर बांगलादेशी नागरिक कल्याण डोंबिवलीमध्ये चाळ परिसरात भाड्याने घर घेत वास्तव्य करून राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. भाड्याच्या अमिषापोटी घरमालक देखील कोणतीही विचारपूस न करता या नागरिकांना घर भाड्याने देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी कल्याण डोंबिवली परिसरातील खडेगोलवलीसह ग्रामीण परिसरातील गावांमधील घरमालकांची चाळमालकांची बैठक घेतली.

kalyan News in Marathi
Kalyan-Shilphata Road: कल्याण-शिळफाटा रोड ५ दिवस बंद; कुठून कराल प्रवास, पर्यायी मार्ग कोणता?

या बैठकीत घर भाड्याने देताना संबंधित भाडेकरूंची माहिती, तपशील स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावा. आपल्याजवळ घर भाड्याने घेण्यासाठी येणारा बांगलादेशी किंवा देशासाठी घातक काम करू शकतो, असा संशय आल्यास तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं. तसेच घरमालकाने ही माहिती दिली नाही, तर त्या घरमालकांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com