Kalyan : सुभाष मैदानात इनडोअर गेम स्टेडियमला विरोध; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या चर्चेदरम्यान खेळाडूंसह मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ

Kalyan News : शहरात मैदाने असली तरी त्यांचा वापर वाणिज्य वापर करुन महापालिका त्यातून उत्पन्न कमावते. त्यामुळे आमचा या प्रकल्प राबविण्यास विरोध आहे; अशी तीव्र विरोधाची भूमिका यावेळी सगळ्यांनी घेतली
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याणच्या सुभाष मैदानात केंद्र सरकारच्या खेलो इंडिया खेलो या योजनेअंतर्गत इनडोअर गेम स्टेडियम तयार केले जाणार आहे. या मैदानावर इनडोअर स्टेडियम करण्यास विरोध केला आहे. हा विरोध पाहता आज माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील हे पाहणी करत चर्चेसाठी आले होते. मात्र चर्चे दरम्यान खेळाडू व मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यामुळे येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

कल्याणमधील सुभाष मैदानात होत असलेल्या इनडोअर स्टेडियमला खेळाडूंसह मनसे व स्थानिक नागरिकांकडून देखील विरोध होत आहे. दरम्यान याठिकाणी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे पाहणीसाठी आले असता त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, जागरुक नागरीक मंचाचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर, क्रीडाप्रेमी समीर खान, सुधाकर शेट्टी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत माळी आदी खेळाडू, नागरीक सुभाष मैदानावर जमले हाेते. 

Kalyan News
Sangli Police : सांगलीच्या एमडी ड्रग्जचे गुजरात, मुंबई कनेक्शन; तपासासाठी तीन पथक

चर्चेतही विरोध कायम 

सर्वांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आले होते. यावेळी सगळ्यांनी मैदानात इनडोअर गेम स्टेडियम करण्यास विरोध दर्शविला. हा प्रकल्प मैदानाच्या बाहेर अथवा लगतच्या जागेत उभारला जावा. त्यासाठी मैदानाच्या जागेचा वापर करु नये. मैदानाच्या शेजारीच एक छोट गार्डन आहे. तसेच प्रेक्षक गॅलरी आहे. त्याठिकाणी हे स्टेडियम करता येऊ शकते. त्यासाठी खेळाच्या मैदानाचा वापर करु नये. दरम्यान शहरात मैदाने असली तरी त्यांचा वापर वाणिज्य वापर करुन महापालिका त्यातून उत्पन्न कमावते. त्यामुळे आमचा या प्रकल्प राबविण्यास विरोध आहे; अशी तीव्र विरोधाची भूमिका यावेळी सगळ्यांनी घेतली.

Kalyan News
Shirpur Police : वन जमिनीवर गांजा शेती; शिरपूर पोलिसांकडून छापा टाकत शेती उध्वस्त

जबरदस्तीचा निर्णय लादला जाणार नाही : माजी मंत्री पाटील 

केंद्र सरकारच्या खेलो इंडिया खेलो या उपक्रमांतर्गत सुभाष मैदानात इनडोअर गेम स्टेडियम उभारण्याकरीता साडेसात कोटीचा निधी मंजूर केला आहे. हे स्टेडियम उभारण्यास स्थानिकांचा विराेध असल्याने खेळाडू, लोकप्रतिनिधीसह महापालिकेची बैठक घेतली जाईल. कोणाचाही अनादर होईल असा जबरदस्तीचा निर्णय लादला जाणार नाही.

या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री पाटील यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी जो डीपीआर तयार केला आहे. त्याचे आरेखन बदलून मैदानाच्या शेजारच्या उद्यानात हा प्रकल्प राबविता येईल का ? याचा विचार केला जाईल. सगळ्यांची चर्चा करुन या प्रकरणी तोडगा काढला जाईल; असे आश्वासन त्यांनी दिले.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com