Sangli Police : सांगलीच्या एमडी ड्रग्जचे गुजरात, मुंबई कनेक्शन; तपासासाठी तीन पथक

Sangli News : सांगली पोलिसांनी २८ जानेवारीला विटा येथे कारवाई करत एमडी ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता. विटा एमआयडीसी येथील माऊली इंडस्ट्रीजमध्ये हा एमडी ड्रग्स बनवण्याचा उद्योग सुरू होता
Sangli Police
Sangli PoliceSaam tv
Published On

सांगली : सांगली पोलिसांनी विटा येथे कारवाई करत एमडी ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याठिकाणी तब्बल २९ कोटी ७५ लाखांचा एमडी ड्रग्ज आढळून आले होते. या प्रकरणी अधिक तपास केला असता विटा येथील एमडी ड्रग्ज प्रकरणात मुंबई आणि गुजरात कनेक्शन समोर आले आहे. यामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

सांगली पोलिसांनी २८ जानेवारीला विटा येथे कारवाई करत एमडी ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता. विटा एमआयडीसी येथील माऊली इंडस्ट्रीजमध्ये हा एमडी ड्रग्स बनवण्याचा उद्योग सुरू होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला याची माहिती मिळाल्यावरछापा टाकत एमडी ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केला. यात तब्बल पावणेतीस कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त करत तिघांना अटक करण्यात आली होती. 

Sangli Police
Crime: हिंजवडीत खळबळ! २० वर्षांच्या मुलाला लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण, प्रायव्हेट पार्टला बाम चोळलं, व्हिडीओ केला व्हायरल

सोमवारी रात्री झालेल्या या कारवाईनंतर सांगलीत खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर मुंबई आणि गुजरातमधून एमडी ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चामाल हा विट्यामध्ये पोहोचायचा. यानंतर तयार झालेला एमडी ड्रग्ज विक्रीसाठी मुंबईमध्ये पाठवण्यात येत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यानुसार पोलिसांकडून आता पुढील तपास करण्यात येत आहे. 

Sangli Police
Cyber Crime : डिजिटल अरेस्ट सांगून गंडविले; पैशांसाठी वृद्धाने शेती काढली विक्रीला, सायबर पोलिसांच्या सतर्कतेने वाचली रक्कम

गुजरात, मुंबईला तीन पथक रवाना 

तब्बल ३० कोटींचा एमडी ड्रग्ज आणि साहित्य जप्त करण्यात आले असून आता हे ड्रग्ज रॅकेट असून हे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी सांगली पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबई आणि गुजरातचे कनेक्शन समोर आल्यावर सांगलीच्या पोलिसांनी गुजरात आणि मुंबई मध्ये तपासासाठी तीन पथके रवाना केली आहेत. याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com