Cyber Crime : डिजिटल अरेस्ट सांगून गंडविले; पैशांसाठी वृद्धाने शेती काढली विक्रीला, सायबर पोलिसांच्या सतर्कतेने वाचली रक्कम

Buldhana News : एका प्रतिष्टीत व्यक्तीला तुमच्या फोन वरून अश्लील फोटोग्राफ्स पाठविले आहेत. तसेच मनी लॉंड्रींग झाले आहे; अशी बतावणी करून तुम्ही डिजिटल अरेस्ट झाले असल्याचे सांगण्यात आले
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

बुलढाणा : सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या पद्धतीने फसणूक केल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशाच प्रकारे मणी लॉन्ड्रींग झाले असून डिजिटल अरेस्ट झाल्याचे सांगत एका वृद्ध व्यक्तीला २८ लाख ५० हजार रुपयात गंडविण्यात आले. आणखी रक्कम द्यायची म्हणून वृद्धाने थेट शेत जमीनच विक्रीला काढली होती. मात्र सायबर पोलिसांच्या सूचकतेने वृद्धाची रक्कम सुरक्षित राहिली आहे.  

बुलढाण्यात एका वृद्धाला काही दिवसांपुर्वीच मुंबई क्राईम ब्रँचकडून बोलत असल्याचा फोन आला. यात तुम्ही एका प्रतिष्टीत व्यक्तीला तुमच्या फोन वरून अश्लील फोटोग्राफ्स पाठविले आहेत. तसेच मनी लॉंड्रींग झाले आहे; अशी बतावणी करून तुम्ही डिजिटल अरेस्ट झाले असल्याचे सांगण्यात आले. यामुळे तातडीने पुढील प्रोसेस पूर्ण करा; असे सांगून त्या वृद्ध व्यक्तीकडून २८ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम उकळली. 

Cyber Crime
Crime: हिंजवडीत खळबळ! २० वर्षांच्या मुलाला लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण, प्रायव्हेट पार्टला बाम चोळलं, व्हिडीओ केला व्हायरल

६० लाख देण्यासाठी वृद्धाने शेती काढली विक्रीला  

यानंतर पुन्हा त्याच्याकडे ६० लाख रुपयाची मागणी केली होती. त्या वृद्धा कडे एवढी रक्कम नव्हती. पैसे दिले नाही तर आपली बदनामी होईल; या भीतीतून वृद्धाने स्वतःची शेती विक्री करण्यासाठी काढली. या शेतीचे सर्व कागदपत्रे घेऊन बुलढाणा शहरात फिरत प्रत्येकाला सांगत फिरत होता की मला शेती विकायची आहे. कुठल्याही भावात विकायची या शेतकऱ्याची तयारी होती. 

Cyber Crime
Ambarnath Corporation : पालिकेचा इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह; घंटागाड्या कमी असल्याने अंबरनाथमध्ये कचराकोंडी

२२ लाख ५० हजार वाचले 

दरम्यान त्या वृद्धला सायबर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असता वृद्धाला विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा त्याने घडलेल्या सर्व प्रकारची माहिती सांगितली. त्यानुसार सायबर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पोलिसांनी संबंधितांचे खाते गोठवले व त्या वृद्धाचे २२ लाख ५० हजार वाचविले. यापूर्वी सुद्धा बुलढाणा जिल्ह्यात असे डिजिटल अरेस्टचे प्रकार वाढले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन ठाणेदार शिरीष खंडारे केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com