Bank Rule: बजेटआधी मोठा निर्णय! UPI ते ATM पर्यंत बँकेच्या 'या' नियमांमध्ये बदल

Bank Rule Change From Today Union Budget 2025: आज १ फेब्रुवारीपासून बँकेच्या नियमांमध्ये काही बदल होणार आहे. बँकेच्या कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे जाणून घ्या.
Bank Rule
Bank RuleSaam Tv
Published On

फेब्रुवारी महिना सुरु झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियमांमध्ये बदल झाले आहे. आज देशाचे अर्थसंकल्प सादर केले जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात बँकेच्या अनेक नियमांमध्य बदल झाले आहे. यामध्ये यूपीआय ते बँकिंगबाबत अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे.फेब्रुवारी महिन्यात बँकेच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. (Bank Rule)

Bank Rule
Budget 2025 Announcements Live Updates : १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त कसं?

ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार पैसे (ATM Rule Change)

१ फेब्रुवारी २०२५ पासून ATM मधून पैसे काढण्यावर शुल्क लागणार आहे. या शुल्कमध्ये बदल करण्यात येणार आहे. नियमांनुसार, प्रत्येक महिन्याला फक्त ३ वेळा मोफत ATM मधून पैसे काढले जाणार आहे. यानंतर प्रत्येक वेळेला पैसे काढण्यासाठी २५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क याआधी २० रुपये होते.जर तुम्ही तुमच्या बँकेच्या एटीएमशिवाय दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले तर त्यासाठी ३० रुपये शुल्क लागणार आहे. तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त ५०,००० रुपये काढू शकतात. (Bank Rule Change From Today)

UPI मध्ये बदल (UPI Change)

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन नियम लागू केले आहे. १ फेब्रुवारीपासून स्पेशल अंकाचा आयडी असणारे ट्रान्झॅक्शन मान्य केले जाणार नाही. म्हणजेच जर तुमच्या आयडीमध्ये #,@,$ असे अंक नसायला हवे.अन्यथा तुमचे यूपीआय ट्रान्झॅक्शन बंद होणार आहे.

Bank Rule
Union Bank Job: यूनियन बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; १५०० रिक्त जागा; पगार ८५०००; पात्रता काय? जाणून घ्या

व्याजदरात बदल (Interest Rate Change)

स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि इतर बँकेच्या व्याजदरात बदल करण्याची शक्यता आहे. १ फेब्रुवारीमध्ये व्याज ३ टक्के ते ३.५ टक्के वाढणार आहे.

कमीत कमी बॅलेंसमध्ये बदल

१ फेब्रुवारीपासून मिनिमम बॅलेंसमध्ये बदल केले जाणार आहे. याआधी भारतीत स्टेट बँकेच्या खात्यात कमीत कमी ३००० रुपये बॅलेंस ठेवणे गरजेचे होते. आता ही लिमिट वाढवून ५००० रुपये करण्यात आली आहे.

Bank Rule
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन इतिहास रचणार, आज सादर करणार आठवा अर्थसंकल्प

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com