१२ लाख रूपयांपर्तंचं उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. अर्थमंत्री निर्माला सितारामन यांनी घोषणा केली. तिसऱ्या टर्मच्या पहिल्याच अर्थसंकल्पातून मोदी सरकारकडून मध्यमवर्गीय नागरिकांना मोठं गिफ्ट दिलेय.
१८ लाख उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के टॅक्स
कस्टम ड्युटीतून ३६ महत्त्वाची औषधं वगळली
ईव्हीचे इंजिन बनवण्यासाठी लागणारा माल स्वस्त
टिव्हीचे देशांतर्गत पार्ट्स स्वस्त होणार
मोफत वाटप होणाऱ्या औषधांवरील
लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर स्वस्त होणार
मोबाईल फोन स्वस्त होणार
भारतात तयार केलेले कपडे स्वस्त होणार
चामड्याद्वारे तयार होणाऱ्या वस्तू स्वस्त
मरिन प्रॉडक्ट्सवरील ड्युटी हटवली
एलईडी, एलसीडी टीव्ही स्वस्त होणार
मुलांची खेळणी होणार
जल जीवन मिशन योजना २०२८ पर्यत वाढवण्याची घोषणा करताना आनंद होत आहे, याच्या एकूण खर्चातही वाढ होईल.
अर्थमंत्री
अनुसूचित जाती आणि आदिवासींना पाच वर्षांसाठी टर्म लोन देण्याचा प्रस्ताव आहे. त्याशिवाय छोट्या उद्योगासाठी कर्जाची मर्यादा 5 कोटी वरून 10 कोटी इतकी करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
स्टार्टअपसाठीची मर्यादा १० कोटींहून २० कोटी इतकी करण्यात येत आहे. लहान उत्पादकांसाठी स्मार्ट क्रेडिट कार्ड ५ लाखांपर्यंतची मर्यादा
शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांकडून कऱण्यातस आली. सरकार ही योजना राज्यासोबत चालवेल. १.७ कोटी शेतकर्यांना या योजनेचा फायदा होईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. गरीब, तरूण, महिला, शेतकर्यांच्या उन्नतीवर लक्ष केंद्रीत करणारा अर्थसंकल्प असेल, असे सितारामन यांनमी सांगितले. शेतीच्या वाढीवर लक्ष केंद्रीत करू, ग्रामीण विकास, उत्पादन लक्षात आले आहे. तसेच, आम्ही आर्थिक क्षेत्राच्या सुधारणेकडे लक्ष देऊ. १०० जिल्ह्यांमध्ये धन धन्या योजना सुरू केली जात आहेत. तसेच, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढली आहे.
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा
राज्याच्या मदतीने ही योजना राबवली जाणार.. या योजनेचा १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल.
१०० जिल्ह्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार.. राज्याच्या मदतीने ही योजना देशभरात राबवली जाणार
देशाला समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प
जगात आपलीच अर्थव्यवस्था सर्वात वेगवान
देशाला प्रगतीकडे नेणं हेचं आमचं लक्ष
सबका विकास हेच आमचं उद्धिष्ठ
Budget 2025 Announcements Live : बजेट सादर करण्यापूर्वी विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. अखिलेश यादव यांच्यासह विरोधीपक्षातील नेत्यांनी आपला विरोध दर्शवला.
आज सादर होणारे बजेट हे सामान्य माणसासाठी असेल. गरीब शेतकरी, महिला आणि तरूण यांच्या आकांक्षाचे हे बजेट आहे. हे ज्ञानाचे बजेट आहे (गरीब, तरुण, अन्नदाता आणि महिला शक्ती).
केंद्रीय मंत्रिमंडाळातून बजेटला मंजूरी देण्यात आली आहे. ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
#WATCH | #UnionBudget2025 | Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman arrives at the Parliament. She will present the Union Budget shortly. pic.twitter.com/sWh7HcQgnR
— ANI (@ANI) February 1, 2025
अर्थमंत्री निर्मला सितारामन आजअर्थसंकल्प सादर करणार आहेत. बजेटच्या आधी शेअर बाजारात सकारात्मक सुरूवात झाली आहे. निफ्टी २० तर सेन्सेक्स ५० अंकांच्या वाढीसह उघडलाय.
अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्राच्या आकांक्षा पूर्ण करेल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. 2014 नंतर कदाचित हे पहिलेच संसदीय अधिवेशन असेल जिथे अधिवेशनापूर्वी परकीय स्रोतांकडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. गेल्या 10 वर्षांपासून प्रत्येक अधिवेशनापूर्वी सातत्याने गोंधळ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असून वातावरण भडकवण्यास तयार असलेल्या लोकांची कमतरता नाही अशी खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली. तथापि, गेल्या दशकातील हे पहिलेच अधिवेशन आहे जिथे कोणत्याही बाह्य कोन्यातून असा गदारोळ माजवला गेला नाही असेही त्यांनी सांगितले.
बजेट सादर करण्यापूर्वी सकाळी साडे दहा वाजता सभागृहात मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहेत. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पला मंजुरी मिळेल. अर्थसंकल्पाची प्रत संसदेच्या सभागृहात पोहोचली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितरामन राष्ट्रपती भवनात दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला पोहचणार आहेत. बजेट सादर होण्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
निर्मला सितारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्या राष्ट्रपतींची परवानगी घेण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाला आहे.
LPG Gas Cylinder New Rate : अर्थमंत्रि निर्मला सितारमन आज २०२५-२६ वर्षांसाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे देशाचं याकडे लक्ष लागलेय. पण त्याआधीच एक दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात झाली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून १९ किलो वजनाच्या व्यवसायिक सिलिंडरच्या दरात ७ रूपयांनी कपात करण्यात आली आहे. आजपासून किंमती लागू करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आर्थिक सर्व्हेक्षणातून महत्वाची माहिती समोर आली आहे. आगामी आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ६.३ टक्के ते ६.८ टक्के होण्याचा अंदाज आर्थिक सर्व्हेक्षणातून समोर आला आहे. सात मुद्दे वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा
अर्थमंत्री निर्मला सितारमन आज बजेट सादर करणार आहेत. त्यांच्याकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. १० लाखांपर्यतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ११ वाजता अर्थमंत्रि बजेट सादर करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प देशातील नागरिकांमध्ये नवा विश्वास निर्माण करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी सांगितलं.
Budget 2025 Expectations Live : अर्थमंत्र्यांच्या पोटाऱ्यातून काय निघणार? कुणाला फायदा ?
Budget 2025 Session LIVE Updates Arthsankalp News :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी ३.० सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असेल. २०२४ मध्ये तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचा पुढील पाच वर्षांचा काय नियोजन असेल, याची झलक यामधून दिसेल. केंद्रीय अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर केला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.