.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिसाला मिळाला. तर नोकरदार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अर्थमंत्र्यांनी नवीन करप्रणाली देखील जाहीर केली. या नव्या कर प्रणालीमध्ये किती उत्पन्नावर किती टक्के कर भरावा लागणार हे सांगण्यात आले आहे. पण ही नवी करप्रणाली पाहून अनेकांचा गोंधळ उडाला आहे. एकीकडे सरकार १२ लाखांपर्यंचे उत्पन्न करमुक्त असल्याचे म्हणत आहे तर दुसरीकडे कर देखील लावत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपण हे १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त कसं? हे जाणून घेणार आहोत...
अर्थतज्ज्ञ नरेश बोडखे यांनी सांगितले की, 'सगळ्या सूट वापरले तर १२ लाखांपर्यंत आयकर लागणार नाही. कोणत्याही सूट वापरले नाही तर ५ टक्के टॅक्स लागेल. घर, विमा, गुंतवणूक लिमिट वापरले तरच तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही.' तसंच, 'हे बजेट ग्राहकाच्या बाजूनं असणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला या बजेटमुळे बूस्ट मिळेल.'
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना सांगितले की, '१२ लाखांपर्यंतच्या कमाईवर कोणताही आयकर भरावा लागणार नाही. पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणले जाईल. या प्रत्यक्ष कर सुधारणा नंतर स्पष्ट केल्या जातील.' १२ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. नवीन करप्रणालीअंतर्गत हा बदल करण्यात आला आहे.
यापूर्वी ७ लाख रुपयांच्या कमाईवर कोणताही कर भरावा लागत नव्हता. आता स्टँडर्ड डिडक्शन फक्त ७५००० रुपये ठेवण्यात आले आहे. आता २४ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारला जाणार आहे. स्टँडड डिडक्शन ५० हजारांवरून ७५ हजार रुपये करण्यात आले आहे. महिन्याला १ लाख उत्पन्न म्हणजेच वर्षाला १२ लाख उत्पन्न असणाऱ्यांना यापुढे कुठलाही कर लागणार नाही. तर १८ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ७० हजारांची सूट मिळणार आहे. २५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १ लाख २० हजारांची सूट मिळणार आहे.
नव्या करप्रणालीनुसार, ४ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ० टक्के म्हणजे कर भरावा लागणार नाही. ४ ते ८ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के कर भरावा लागेल. ८ ते १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर भरावा लागेल. १२ ते १६ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के, १६ ते २० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर भरावा लागले. तर २० ते २४ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २५ टक्के आणि २४ लाखांच्या वरील उत्पन्नावर ३० टक्के कर भरावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.