Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत 'अर्थसंकल्प- GYAN' मांडताना विरोधकांचा सभात्याग
Budget 2025 Saam Tv

Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पातून 'GYAN' मांडताना विरोधकांचा सभात्याग

opposition walkout parliament budget session: अर्थसंकल्पाला सुरूवात होण्याआधीच विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी सभात्याग केला.
Published on

देशाचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली. अर्थमंत्र्यांनी 'अर्थसंकल्प- GYAN' मांडताना विरोधकांनी संसदेमध्ये गदारोळ केला. विरोधकांनी संसदेमध्ये गोंधळ घालत मोठमोठ्याने घोषणाबाजी केली आणि सभात्याग करून बाहेर पडले.

अर्थसंकल्पाला सुरूवात होण्याआधीच विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प वाचण्यास सुरूवात करताच विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली आणि ते सभागृहातून बाहेर पडले. कामकाज सुरू होताच विरोधक कुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून आक्रमक झाले आणि त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आणि घोषणाबाजी केली.

प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबत आधी चर्चा करावी या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी सभात्याग करत ते बाहेर पडले. महाकुंभ मेळ्यातल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची यादी सरकारने जाहीर करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी केली आहे.

Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत 'अर्थसंकल्प- GYAN' मांडताना विरोधकांचा सभात्याग
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन इतिहास रचणार, आज सादर करणार आठवा अर्थसंकल्प

अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन १८ व्या लोकसभेचा पहिला आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा हा लागोपाठ आठवा अर्थसंकल्प आहे. २ फेब्रुवारीला रविवार असल्याने सुट्टी आहे. त्यानंतर ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी या दोन दिवसांत लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ फेब्रुवारीला राज्यसभेत चर्चेला उत्तर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत 'अर्थसंकल्प- GYAN' मांडताना विरोधकांचा सभात्याग
Budget 2025 Announcements Live Updates : १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त कसं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com