Budget 2025 : अर्थमंत्र्यांची पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा; १०० जिल्ह्यांचा समावेश, १.७ कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

Agriculture Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवली जाणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याचेही त्यांनी सांगितले.
Budget 2025 pm dhan dhanyan krishi yojana
Budget 2025 pm dhan dhanyan krishi yojanaSaam Tv
Published On

Budget 2025 Updates : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प २०२५ मांडायला सुरुवात केली आहे. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच त्यांनी शेतकऱ्यांचा उल्लेख केला. त्यांनी 'पीएम धन धान्य कृषी योजने'ची घोषणा केली. ही योजना १०० जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. यामुळे देशातील १ कोटी ७ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

राज्याच्या मदतीने केंद्र सरकार देशात पीएम धन धान्य कृषी योजना राबवणार आहे. गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या उन्नतीवर केंद्रीत हा अर्थसंकल्प असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. शेतीच्या वाढीवर लक्ष केंद्रीत करुन ग्रामीण भागाचा विकास करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली.

तूर, मूग, मसूर अशा कडधान्यांचे ६ वर्षाचे केंद्राचे मिशन असणार आहे. तर कापूस वाढीसाठी ५ वर्षांचे मिशन असणार आहे. यूरीया उत्पादनात आत्मनिर्भरतेचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याशिवाय खाद्यतेल, डाळ यांच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्याचा निर्धार असल्याचेही सीतारमन यांनी सांगितले.

किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. शेतकऱ्यांसाठीची क्रेडिट कार्ड मर्यादा (KCC) आता ३ लाख रुपयांवरून वाढवून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ७ कोटी शेतकऱ्यांना अगदी सहजपणे कर्ज मिळू शकणार आहे.

Budget 2025 pm dhan dhanyan krishi yojana
Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पातून 'GYAN' मांडताना विरोधकांचा सभात्याग

डेअरी, मस्त्यउद्योगांसाठी ५ लाख कर्ज देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारमन यांनी केली. याशिवाय फळ, भाजी उत्पादनासाठी विशेष योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्पादन नवाढीसाठी राज्यांसोबत योजना राबवल्या जातील. कृषी क्षेत्रात एआय वापर करण्याचाही निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.

Budget 2025 pm dhan dhanyan krishi yojana
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रानंतर आता देशातही लाडकी बहीण योजना? बजेटआधी पंतप्रधान मोदींनी दिले संकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com