Maharashtra Election : मतदानाला सुट्टी, सूट द्याच, अन्यथा... सरकारचा आदेश जारी, नेमकं काय म्हटलं?

Maharashtra Election 2024: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
assembly election 2024
maharahstra assembly electionyandex
Published On

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४दिवशी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, सुट्टी किंवा सवलत न दिल्यामुळे मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास आस्थापनांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दिली आहे.

assembly election 2024
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील, कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.

assembly election 2024
Government Scheme: व्यवसाय सुरु करा, कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांचे कर्ज; पीएम विश्वकर्मा योजना नक्की आहे तरी काय?

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामासाठी मतदार संघांच्या बाहेर असतील, तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने उदा. खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व अन्य आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदींना ही सुट्टी किंवा सवलत लागू राहील. सर्व आस्थापना, कारखाने व दुकानांनी या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

जिल्ह्यातील सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील निवडणूकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास पुणे विभाग सहाय्यक कामगार आयुक्त श्री. नि. अ. वाळके, भ्रमणध्वनी क्र.9975933416, श्रीमती त. श. अत्तार, भ्रमणध्वनी क्र. 9890424813, श्री. डी. डी. पवार, भ्रमणध्वनी क्र. 7775963065, दुकाने निरीक्षक श्री. बी. व्ही. लांडे, भ्रमणध्वनी क्र. 9921971163, श्री. राजेंद्र ताठे, भ्रमणध्वनी क्र. 9420763111 तसेच अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या alcpune5@gmail.com व कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय, पुणे जिल्हा या कार्यालयाच्या dyclpune2021@gmail.com ई-मेल आयडीवर तक्रार दाखल करावी, असेही श्री. पोळ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

assembly election 2024
Post Office Scheme: सरकारचा मोठा निर्णय! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत आता व्याज मिळणार नाही, तुम्हीही केली होती का गुंतवणूक?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com