Dubai Rain Alert : दुबईवर जलप्रलयाचं संकट! मुसळधार पावसाच्या शक्यतेने फ्लाईट्स रद्द, शाळा बंद

Dubai Rain Alert update : दुबईवर पुन्हा एकदा जलप्रलयाचं संकट उभं ठाकलं आहे. दुबईतील विविध भागातील पावसाच्या शक्यतेमुळे विमानतळावर अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत
Dubai Rain Alert
Dubai Rain Alert File photo

नवी दिल्ली : दुबईवर पुन्हा एकदा जलप्रलयाचं संकट उभं ठाकलं आहे. दुबईतील विविध भागातील पावसाच्या शक्यतेमुळे विमानतळावरील अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे दुबई सरकारने नागरिकांना अलर्ट मोड जारी केला आहे.

दुबईतील हवामान विभागाने, गुरुवारी ऑरेंज अलर्ट जारी करत विजेच्या गडगडासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर दुबईत मध्यरात्री २.३५ वाजता पावसाने हजेरी दर्शवली.

या पार्श्वभूमीवर दुबई सरकारने लोकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. होडीचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सरकारने सखल भागातून वाहने जपून चालवण्याचा सूचना दिल्या आहेत. हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Dubai Rain Alert
PM Narendra Modi Rally: शहजादेला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा, पीएम मोदींचा राहुल गांधींवर पुन्हा निशाणा

कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉमच्या सूचना

दुबईतील मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच अनेक शाळांना ऑनलाईन स्वरुपात वर्ग भरविण्यास सांगितलं आहे.

Dubai Rain Alert
Sidhu Moosewala: सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात मोठी अपडेट, गोल्डी ब्रारसह 25 जणांवर आरोप निश्चित

१६ एप्रिलला जोरदार पाऊस

तत्पूर्वी, दुबईतील नागरिकांना १६ एप्रिल रोजी मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. त्या मुसळधार पावसामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. दुबईतील विमानतळावरही पाणी भरलं होतं. तर रस्त्यावर वाहने तरंगत होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com