मयूर राणे, मुंबई प्रतिनिधी
Mumbai train coach fire Matunga yard CSMT details : माटुंगा येथील रेल्वे कारशेडमध्ये असलेल्या मध्य रेल्वेच्या डब्ब्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. CSMT बाजूच्या शौचालयात वेल्डिंगचे काम सुरू होते. ही वेल्डिंग सुरू असताना एक ठिणगी मध्य रेल्वेवर गेली अन् आगीचा भडका उडाला. आग झपाट्याने वाढत गेली अन् जिकडे तिकडे धूर दिसत होता. संपूर्ण डब्बा जाळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. आग लावली की लागली? याचा तपास केला जात आहे. पण सुदैवाने कारशेडमधील इतर गोष्टींचे नुकसान झाले नाही. दरम्यान, वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पण मनसे कामगार सेनेने या घटनेवर संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.
स्थानिक प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, माटुंगा कारशेडमध्ये एका स्लीपर कोचच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. दुपारी साधारण ३:१० वाजता डब्यातून धूर येण्यास सुरुवात झाली आणि काही क्षणातच आगी पसरली. डब्याच्या सीएसएमटी (CSMT) बाजूकडील शौचालयात वेल्डिंगचे काम सुरू असताना उडालेल्या ठिणग्यांनी जवळच असलेल्या साहित्याचा पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की बघता बघता संपूर्ण डबा खाक झाला.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत जळणारा डबा तातडीने मोकळ्या जागेत ढकलला. त्यामुळे शेजारील इतर डबे आणि वर्कशॉपच्या पायाभूत सुविधांना आगीची झळ बसली नाही. अथक प्रयत्नांनंतर दुपारी ४:०० वाजेपर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत डब्याचा वरचा सुमारे ७०% भाग जळून खाक झाला आहे.
ही आग लागली की लावली गेली? असा खळबळजनक सवाल मनसे कामगार सेनेचे चिटणीस अनिश खंडागळे यांनी उपस्थित केला आहे. कारशेडमधील सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. प्राथमिक तपासात वेल्डिंग हेच कारण समोर येत असले तरी, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.