Pune traffic police kidnapping attempt drunk driver case : पुण्यात दिवसाढवळ्या वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. वारजेमध्ये घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे पुणे पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका बेजबाबदार चालकाने अनेक वाहनांना धडक दिली. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्याचाही धक्कादायक प्रयत्न केला. पण उत्तमनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे या चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
स्थानिक प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी चालक चारचाकी गाडीतून उत्तमनगरहून वारजेच्या दिशेने प्रचंड वेगात येत होता. तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता. रस्त्याने जात असताना त्याने वाटेत येणाऱ्या काही गाड्यांना धडक दिली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. गाडीचा वेग आणि चालकाचे वर्तन पाहता मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण थोडक्यात अनर्थ टळला.PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्यांच्या कामाची गोष्ट
अपघाताची माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने गाडी थांबवण्यासाठी चालक बसलेल्या बाजूचे दार उघडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. पण चालकाने गाडी न थांबवता पोलिसाला घेऊनच गाडी जोरात पळवायला सुरुवात केली. काही अंतरापर्यंत त्याने या पोलिसाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
उत्तमनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आणि सतर्कतेने आरोपीची गाडी अडवली. त्यानंतर त्य चालकाला ताब्यात घेतले. भररस्त्यात लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि पोलिसालाच किडनॅप करणाऱ्या या मद्यधुंद चालकाला पोलिसांनी जागीच चांगलाच चोप दिला. या धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे. आरोपीला धडा शिकवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उत्तमनगर पोलिसांकडून आणखी तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.