Air India : एअर इंडियाचा प्रवास महागला, तब्बल ₹२६००० हजारांपर्यंत तिकीट वाढले, नवे दर कधीपासून?

Air India fare hike : जेट इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे एअर इंडियाने तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या भाड्यात वाढ झाली असून काही मार्गांवर ₹२६,००० पर्यंत वाढ होणार आहे.
Air India
Air indiarepresentative image
Published On

Air India ticket price increase April 2026 fuel surcharge details : आखाती देशात (इराण-इस्त्राइल) मागील महिन्यापासून सुरू असलेल्या युद्धामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जगभरात इंधनाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे जेट फ्लूलचे दरही वाढले आहेत. त्याचा परिणाम हवाई प्रवासावर झाला आहे. देशातील प्रमुख विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाने तिकिटात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरा‍त्रीपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय तिकिटाच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे.

एअर इंडियाने फ्लूल सरचार्चमध्ये (अधिभार) बदल केला आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय तिकिटाच्या किंमतीत बदल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसारी, देशांतर्गत फ्लाइटच्या तिकिटात २९९ ते ९८८ रूपयांपर्यंत वाढ होऊ शकते. तर आंतरराष्ट्रीय विमानाच्या तिकिटाची किंमत २२०० ते २६००० पर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Air India
डासांसाठी तुम्ही वापरत असलेल्या २ अगरबत्त्या कायमच्या बंद, राज्य सरकारने कारखान्याला लावले कुलूप

नवे दर कधीपासून ?

जगभरात जेट फ्लूलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळेच एअर इंडियाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही मार्गावर फ्यूल सरचार्जमध्ये बदल केला आहे. हे नवीन दर ८ एप्रिलपासून अनेक मार्गावर लागू होणार आहे. तर यूरोप, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या मार्गावरील सरचार्ज 10 एप्रिलपासून लागू होणार आहे. दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतलेल्या निर्णायानंतरच तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे एअरलाइनने सांगितले. यामध्ये देशांतर्गत एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या किमतीतील वाढ २५ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे.

Air India
PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

एअर इंडियाने देशांतर्गत फ्लाइटसाठी निश्चित फ्यूल सरचार्ज ठेवला नाही. फ्लाइट किती दूर जाणार आहे, त्या अंतरानुसार फ्यूल सरचार्ज एअर इंडियाकडून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कमी अंतर असलेल्या फ्लाइटचे तिकिटात कमी वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी अधिक बदल केला आहे. कारण आंतरराष्ट्रीय एटीएफच्या दरांवर कोणतीही मर्यादा नाही. दरम्यान या वाढीवर एअर इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हा फ्लूल सरचार्च जेट इंधनाच्या दरातील वाढ पूर्ण भरून काढत नाही. या वाढीचा काही भाग एअरलाइनलाच सोसावा लागत असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले.

Air India
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे ₹१५०० येणार की नाही? ५ मिनिटांत तुम्हीच करा चेक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com