Maharashtra Politics : भाजप शिंदेंवर मेहरबान? भाजपनं छाटले अजितदादांचे पंख? वाचा स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar News : महायुतीतील कुरघोडीच्या राजकारणाची जोरदार चर्चा रंगलीय.. अजित पवारांच्या निर्णयावर शिंदेंचा वॉच असणार आहे... मात्र शिंदेंना ताकद देऊन भाजप अजित पवारांचे पंख छाटत आहे का? पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून...
mahayuti
Maharashtra Politics:Saam tv
Published On

राज्यातील सर्वच विभागाच्या फाईल्सचा प्रवास आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या दालनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनाकडे होईल. त्यानंतर या फाईल्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात अंतिम निर्णयासाठी येतील.

mahayuti
Mumbai Local : लोकलच्या डब्यातून अचानक निघाला धूर; रेल्वे सेवा विस्कळीत होताच प्रवाशांची स्टेशनवर गर्दी, धडकी भरवणारा VIDEO

होय...तुम्ही बरोबर ऐकताय...राज्यात विधानसभा निवडणुकीपासून मंत्रीमंडळ विस्तार ते अर्थसंकल्प आणि नुकतंच पार पडलेलं अधिवेशन या सर्वात सातत्यानं एक गोष्ट चर्चेत होती ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयानं अजितदादांच्या निर्णयांवर शिंदेंचा वॉच असेल अशा चर्चा रंगल्या आहेत. फाईलींचा प्रवास कसा असेल पाहुया...

mahayuti
Affordable Healthcare : नागरिकांना अवघ्या १ रुपयांत मिळणार वैद्यकीय उपचार; जाणून घ्या संपूर्ण योजना एका क्लिकवर

दादांच्या निर्णयावर शिंदेंचा 'वॉच' -

- अजित पवारांकडून सर्व विभागांच्या फाईल्स आता शिंदेंकडे जाणार

- पुढे मुख्यमंत्री फडणवीसांच्या दालनात अंतिम निर्णय

- मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिंदेंना बळ दिल्याची चर्चा

- भाजप एकनाथ शिंदेंवर मेहेरबान?

- अजित पवारांच्या अधिकारांवर नियंत्रण?

एकीकडे अजित पवार निधी देत नाहीत मविआ सरकारपासून सुरु झालेलं कोल्डवॉर अजुनही कायम आहे. तर दुसरीक़डे विधानसभा निवडणुकीनंतर

शिंदेंच्या नाराजीत अधिकच वाढ झालीये. मात्र या निर्णयामुळे अचानक भाजपने शिंदेंना का बळ दिलंय.? यावर मंत्री शंभुराज देसाईंनी स्पष्टीकरण दिलंय...

mahayuti
Navi Mumbai : ५ मजली अनधिकृत इमारत, ९० छोटे फ्लॅट; सिडकोने थेट जेसीबी फिरवला, शेकडो बेघर

राज्यातील महायुती सरकारमध्ये सुप्त सत्ता संघर्ष असल्याचं बोललं जातं.. महायुतीच्या नेत्यांनी या चर्चा फेटाळल्या असल्या तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी तीनही पक्ष सोडत नाहीत. मात्र दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये अधिकाराची समान वाटणी झाल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात भाजपनं अजितदादांचे पंख छाटून शिंदेंना बळ दिलंय का? आता यावर यावर अजितदादा काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय. त्यावरुन महायुतीत पुन्हा संघर्ष पेटणार का हेच पाहायचं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com