Rain Alert : राज्यात पुढील काही दिवसांत धो धो पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान? वाचा

Maharashtra Weather Update News : गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता असून नंदूरबार, नाशिक घाटमाथा आणि नांदेडमध्ये विजांसह सरींचा अंदाज आहे.
Maharashtra Weather Forecast Rain Update News
Maharashtra Weather Forecast Rain Update News AI Image
Published On
Summary
  • ११ सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

  • महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होण्याचा अंदाज.

  • नंदूरबार, नाशिकचा घाटमाथा आणि नांदेडमध्ये तुरळक पावसाची शक्यता

  • पावसाच्या विश्रांतीमुळे वाढलेला उकाडा कमी होण्याची शक्यता

गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला असून अनेक दिवसांपासून दडी मारलेला पाऊस गणरायाच्या स्वागतला पुन्हा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक भागांत काही दिवसांपासून तपमानाचा पारा वाढलेला असल्याने उकाड्यात काहीशी वाढ पाहायला मिळाली. तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाड्याचा सामना करावा लागला. मात्र, आता राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत स्थानिक वातावरणाच्या प्रभावामुळे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विशेषतः नंदूरबार, नाशिकचा घाटमाथा आणि नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात.

Maharashtra Weather Forecast Rain Update News
IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

दरम्यान, राज्यातील उर्वरित भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ऊन तर काही वेळ ढगांची दाटी, असा हवामानाचा खेळ सुरू राहणार आहे. यामुळे पावसाची शक्यता पूर्णपणे संपलेली नसून, तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. मात्र, अनेक भागांत सध्या पावसाऐवजी उघडीपच अधिक राहण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Weather Forecast Rain Update News
Gavar Side Effects : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

राज्यातील पावसाच्या दृष्टीने ११ सप्टेंबरपासून परिस्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे सध्या जाणवत असलेला उकाडा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे तापमानात वाढ झाली आहे. परिणामी सकाळपासूनच वातावरण उष्ण जाणवत असून दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक तीव्र होत आहे. आता पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होत असल्याने पुढील काही दिवसांत राज्यातील हवामानात पुन्हा चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com