महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! ऑगस्ट अखेरीस राज्यात ५४ टक्के पावसाची तूट, वेधशाळेने दिली माहिती महत्वाची माहिती

Maharashtra Records 54 Percent Rainfall Deficit By August End: महाराष्ट्रात पावसाने घेतला ब्रेक! ऑगस्ट अखेरीस राज्यात 54 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता असून पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे पुणे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.
Maharashtra Rain Break: State Records 54% Rainfall Deficit By August End
Maharashtra Rain Break: State Records 54% Rainfall Deficit By August Endsaam tv
Published On

मुंबई पुण्यासह राज्यातील बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या श्रावण सरी पडत असल्या तरी अद्यापही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान वेधशाळेने वर्तवलेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस होईल मात्र कुठेही मुसळधार पावसाचा अंदाज नसल्याचं पुणे वेधशाळेने स्पष्ट केलं आहे. जुलै महिन्यात सक्रिय झालेली हवामान प्रणाली यामुळे राज्यात सर्वदूर पाऊस झाला मात्र ही प्रणाली आता कार्यरत नसल्यामुळे पावसाची अनुकूल परिस्थिती महाराष्ट्र वर सध्या नाही त्यामुळे पावसाचा जोर महाराष्ट्रात दिसत नसल्याचं पुणे वेधशाळेने सांगितलं.

Maharashtra Rain Break: State Records 54% Rainfall Deficit By August End
Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७ टक्के जास्त पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

तसंच ऑगस्ट अखेरीस राज्यात 54 टक्के पावसाची तूट झाल्याची नोंद पुणे वेधशाळेने नोंदवली आहे. ऑगस्ट महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला त्यामुळे राज्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट नोंदवली गेली आहे.

Maharashtra Rain Break: State Records 54% Rainfall Deficit By August End
Maharashtra weather : पुण्यासह १० जिल्ह्यांत मुसळधार पाऊस हजेरी लावणार, हवामान विभागाचा अंदाज

ऑगस्ट महिन्यातील पावसाची जिल्हानिहाय तूट (टक्केवारी)

मुंबई: ३५ टक्के तूट

ठाणे: ३२ टक्के तूट

पालघर: ४३ टक्के तूट

पुणे: २३ टक्के तूट

नाशिक: ३ टक्के जास्त

सातारा: १९ टक्के जास्त

अहिल्यानगर: ७४ टक्के तूट

रायगड: ३० टक्के तूट

रत्नागिरी: २५ टक्के तूट

सिंधुदुर्ग: २४ टक्के तूट

कोल्हापूर: १० टक्के तूट

सांगली: ३२ टक्के तूट

सोलापूर: ७७ टक्के तूट

धाराशिव: ७३ टक्के तूट

बीड: ८५ टक्के तूट

लातूर: ५२ टक्के तूट

नांदेड: ६० टक्के तूट

यवतमाळ: ७९ टक्के तूट

चंद्रपूर: ६४ टक्के तूट

गोंदिया: २५ टक्के तूट

नागपूर: ७८ टक्के तूट

अमरावती: ८६ टक्के तूट

अकोला: ८५ टक्के तूट

बुलढाणा: ५९ टक्के तूट

जालना: ७५ टक्के तूट

छत्रपती संभाजीनगर: ४६ टक्के

जळगाव: २१ टक्के तूट

नंदुरबार: १४ टक्के तूट

धुळे: २० टक्के तूट

गडचिरोली: ३४ टक्के तूट

भंडारा: ४४ टक्के तूट

वर्धा: ८४ टक्के तूट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com