Maharashtra Politics: राहुल नार्वेकरांविरोधात ठाकरे-पवार एकत्र; सुप्रीम कोर्टात आज महत्वपूर्ण सुनावणी

Mla Disqualification Case: आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात केली आहे.
maharashtra politics Uddhav Thackeray Sharad Pawar Mla Disqualification Case Supreme Court Hearing Today
maharashtra politics Uddhav Thackeray Sharad Pawar Mla Disqualification Case Supreme Court Hearing Today saam tv
Published On

प्रमोद जगताप, साम टीव्ही

Uddhav Thackeray Sharad Pawar Mla Disqualification Case

आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार असून सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. ठाकरे गटाकडून सुनील प्रभू, तर शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. (Latest Marathi News)

maharashtra politics Uddhav Thackeray Sharad Pawar Mla Disqualification Case Supreme Court Hearing Today
Raj Thackeray Meet Eknath Shinde: CM एकनाथ शिंदे- राज ठाकरे यांच्यात टोलच्या मुद्द्यावर 2 तास चर्चा, बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

विधानसभा अध्यक्षांना वारंवार पत्राद्वारे विनंती करूनही आमदारांच्या अपात्रतेवर वेळकाढूपण केला जात असल्याचा मुद्दा शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटानं सुप्रीम कोर्टासमोर मांडला आहे. त्यामुळे दोन्ही याचिका एकाच वेळी सुनावणीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

शिवसेनेकडून सुनील प्रभू यांनी याचिका दाखल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. तर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करावी, यासाठी कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सूचना द्यावात, अशी मागणी शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून करण्यात आलेली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरील दबाव वाढला आहे. दोन्ही प्रकरण सारखी असल्यामुळे सुप्रीम कोर्ट एकच निर्देश देण्याची शक्यता आहे. अध्यक्षांना लवकरात लवकर प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश सु्प्रीम कोर्ट देण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेतली. यावेळी विधानभवनात अध्यक्षांसमोरच ठाकरे-शिंदे गटात जोरदार खडाजंगी झाली. अपात्रतेप्रकरणी ३४ याचिका आहेत आणि सर्व याचिकांवर वेगवेगळी सुनावणी होत असल्यामुळे विलंब होत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला.

त्यावर शिंदे गटानं जोरदार आक्षेप घेतला आहे. वेगवेगळ्या घटना,मुद्दे असल्याने एकत्र सुनावणी घेणं योग्य नाही असं शिंदे गटाचं म्हणणे आहे. सर्व याचिकांवर वेगळी सुनावणी घेतल्यामुळे वेळ लागेल असा दावा ठाकरे गटाने केला. ठाकरे गटानं 3 अर्ज दिले, त्यामुळे विलंब होतोय असं शिंदे गटाचे म्हणणे आहे. दरम्यान, यावर विधानसभा अध्यक्ष २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार आहे.

maharashtra politics Uddhav Thackeray Sharad Pawar Mla Disqualification Case Supreme Court Hearing Today
Operation Ajay: सुटकेचा निःश्वास! इस्रायलमधून २१२ भारतीय मायदेशी परतले; मोदी सरकारचं 'ऑपरेशन अजय' सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com