राजकारणात उलथापालथ होणार, एकनाथ शिंदे ठाकरेंचे ८ खासदार फोडणार? संजय राऊतांनी मोजक्या शब्दात विषय संपवला

Sanjay Raut News : एकनाथ शिंदे ठाकरेंचे ८ खासदार फोडणार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु संजय राऊतांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
Sanjay Raut News update
Sanjay Raut News Saam tv
Published On
Summary

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होण्याचा दावा करण्यात आलाय

एकनाथ शिंदेंकडून पुन्हा 'ऑपरेशन टायगर'

ठाकरेंचे खासदार फोडणार असल्याचा दावा संजय राऊतांनी फेटाळला

राज्याच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा 'ऑपरेशन टायगर' राबवत असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे ८ खासदार फोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी झालेल्या एका गुप्त बैठकीत राजकीय खळबळ उडाली आहे. परंतु ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी खोडून काढला.

Sanjay Raut News update
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

ठाकरे गटाकडे एकूण ९ खासदार आहेत. ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी फोडण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती हाती आली आहे. ठाकरेंच्या ९ खासदारांपैकी ८ खासदारांशी संपर्क साधल्याचे सांगितलं जात आहे. ठाण्यात एक गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत ६ खासदार उपस्थित होते, तर २ खासदार व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित होते, असा दावा करण्यात आलाय. फोफोडीच्या दाव्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं.

ठाकरेंचे खासदार संजय राऊत म्हणाले, 'भाजपने सुशिक्षितपणा आणि सभ्यपणा निवडणुकीत दाखवला जातो. ऑपरेशन एकदाच केला जातो. वारंवर हे मृतदेहाचं ऑपरेशन करतात. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे पक्षाचे ऑपरेशन करतात. विरोधी पक्षाच्या खासदार, आमदारांना महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी दिला जात नाही. सत्ताधाऱ्यांना कोटी कोटीचा निधी दिला जातो'.

Sanjay Raut News update
Maharashtra Politics: राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार; शिवसेना खासदारचा दावा

'देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात मोठी झेप घ्यायचे असेल, त्यांनी संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. कुणाल कामरा विटंबना करत नाहीत. विडंबना करतात. ते उत्तम कवी आहेत, कॉमेडीयन आहेत.विधिमंडळाचा वेळ वाया घालवणे योग्य नाही. विरोधी पक्ष आमदार-खासदार जनतेतून निवडून आले आहेत. खासदारांना निधी मिळत नाही अडचण आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com