

संजय राऊतांनी ५० आमदार भाजपात जाण्याचा दावा केला
राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत फुटीची चर्चा
काही नेत्यांनी शक्यता मान्य केली, तर काहींनी फेटाळली
राज्याच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता
राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरेसेनेचे नेते संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडालीये. कोणते आमदार पक्ष सोडून जाणार आहेत? पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट...
संजय राऊतांच्या या दाव्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीये. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेनेतल्या प्रत्येकी 25-30 आमदारांचा गट भाजपात विलीन होईल असा दावा संजय राऊतांनी केलाय. त्यामुळे राज्यात पुन्हा ऑपरेशन लोटस सुरू होणार असल्याचं चर्चा रगंलीय.
राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेचे आमदार लगेचच भाजपात जाणार नसले तरी पुढच्या काळात हे घडण्याची शक्यता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेनीही बोलून दाखवलीय. तर अजित दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफांनी मात्र राऊतांनी आपल्या पक्षाचे खासदार सांभाळावेत असा टोला लगावत फुटीची शक्यता फेटाळून लावलीय.
खरंतर, अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार राष्ट्रवादीवर आपली पकड मजबूत करत आहेत. असं असताना सुनेत्रा पवार विरुद्ध पटेल-तटकरे यांच्यात अंतर्गत धूसफूस असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजप शिंदेंसेनेला खिंडीत गाठण्याची एकही संधी सोडत नसल्यामुळे शिंदेंचे आमदार अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. आणि त्यामुळेच राज्याच्या राजकारणात भूकंप होणार का याकडं राज्याचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.