

गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. दसरा मेळाव्याच्या मैदानावरुन सुरू असलेला शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामधील वाद अखेर संपला असून शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचे ठिकाणही ठरले आहे. आझाद मैदानावर हा दसरा मेळावा होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) मैदानावरुन वाद सुरू होता. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्क मैदानावर दावा करण्यात आला होता.
मात्र पालिकेने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर (Shivaji Park) सभा घेण्यास परवानगी दिली. शिंदे गटाकडून दसरा मेळावासाठी क्राॅस मैदान व आझाद मैदानांचे पर्याय ठेवण्यात आले होते. अखेर हा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
दरम्यान, क्राॅस मैदानावर क्रिकेटच्या मैदानांचे असल्याने नियोजन करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळेच आता आझाद मैदानवर शिवसेनेचा दसरा मेळावा घेतला जाणार आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कवरुन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) आणि आझाद मैदानावर एकनाथ शिंदेची (Eknath Shinde) तोफ धडाडणार असल्याचे अखेर निश्चित झाले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.