''छगन भुजबळ असू द्या की, कोणताही राजकीय नेता. मी वैयक्तिक टीका करत नाही. पण मतभेद नक्कीच असू शकतात. मराठा आंदोलनावर ते एकटेच बोलतात.'', असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. साम टीव्हीशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.
छागन भुजबळ यांना लक्ष्य करत ते म्हणाले आहेत की, ''मराठ्यांनी त्यांना मोठे केले आणि ते शिवसेनेने मोठे केले असे म्हणतात. म्हणजे तुम्हाला ज्या मराठा समाजाने मोठे केले. ज्यांनी तुम्हाला राजकीय ओळख दिली. तुमचा मान, प्रतिष्ठा जपली, त्यांनाच तुम्ही विसरला. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी ओबीसी प्रमाणपत्रावर निवडणूक लढवली. तुम्ही मोठे झाला, तुमची मुल मोठी झाली. आता मराठ्यांना आरक्षण देण्याची वेळ आली तेव्हा मात्र टीका करता.''
आमचे आंदोलन शांततेतच होईल. मात्र या आंदोलनाने सरकारले स्वस्थ झोप लागणार नाही. मराठा आंदोलनाला केंद्राने कमी आखू नये. इतर राज्यात निवडणूका आहेत. तशा महाराष्ट्रतही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर लक्ष घालावे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पाटील म्हणाले, ''आंतरवाली सराटी सभेच्या खर्चावर प्रश्न उपस्थित होते. पण मराठा समाज आपणहून आला. लोकवर्गणीतून खर्च झाला. कुणी जागा दिली. कुणी साऊंड सिस्टीम दिली. म्हणूनच हे आंदोलन लोकांचे आहे.'' (Latest Marathi News)
ते म्हणाले, 'पाच कोटी' मराठा ओबीसीत आले तर आरक्षणाला धोका बसेल असा अपप्रचार काही ओबीसी नेते करतात आणि ' पाच कोटी मराठा' या शब्दांवर जोर देतात. आम्ही पूर्वीपासूनच आरक्षणाच्या निकषात बसतो. संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. उलट कितीही खोटी माहिती दिली तरीही गावातील ओबीसी समाज आमच्या मदतीसाठी धावत आला.
''मराठा आणि धनगर समाज एकत्र आले तर राजकीय पक्षांना खूप अवघड जाईल''
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ''आज मराठा समाजाची जी अवस्था आहे, तीच अवस्था धनगर समाजाचीही आहे. मराठा आणि धनगर दोन्ही समाजाचा वापर झाला. सत्तेत येण्यापूर्वी ' तुम्हाला आरक्षण देऊ ' असे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्यांनी दोन्ही समाजाची दिशाभूल केली. खरेतर राज्यात सर्वात मोठी जात मराठा नंतर धनगर आहेत. हे दोन्ही समाज एकत्र आले तर राजकीय पक्षांना खूप अवघड जाईल.''
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने ४० दिवसांचा अवधी मागितला होता. त्याचेच शेवटचे ८ दिवस उरलेत. या दहा दिवसात त्यांनी आपला शब्द पाळावा. पूर्वीप्रमाणेच २२ अॉक्टोबरचे आंदोलन शांततेतच होईल. मात्र ते सरकारला झेपणार नाही. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.