Dhananjay Munde: ...तर मी देखील माझ्या घरी दिवाळी साजरी करणार नाही; धनंजय मुंडे असं का म्हणाले?

Dhananjay Munde News: बीडमध्ये कृषी विभागाच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
Dhananjay Munde News
Dhananjay Munde NewsSaam Tv News
Published On

Maharashtra Politics News:

येणाऱ्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा अग्रीम जमा करण्यात येणार आहे . जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा अग्रीम जमा नाही झालं तर, मी देखील माझ्या घरात दिवाळी साजरी करणार नाही. असा शब्द आणि विश्वास राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. ते बीडमध्ये कृषी विभागाच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते. (Latest Marathi News)

Dhananjay Munde News
Kalyan Crime: संतापजनक! कॅब चालकाकडून प्रवासी तरुणीचा विनयभंग, कल्याण पूर्वेतील घटना

यावेळी ते म्हणाले की, बीड जिल्ह्याची ओळख ही वारंवार मागासलेला जिल्हा, ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून केली जात आहे. मात्र ही ओळख कुठेतरी आपल्याला मोडायची आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मागासलेपणाची आणि ऊसतोड मजूर म्हणून असणारी जिल्ह्याची ही ओळख मोडल्याशिवाय शिवाय स्वस्त बसणार नाही. असा प्रण धनंजय मुंडे यांनी केलाय.

पुढे बोलतांना मुंडे म्हणाले की, आज जर शेतकरी संकटात असेल तर कृषीमंत्री म्हणून मी दिवाळी कशी साजरी करणार? मी देखील शेतकऱ्याचं पोरगा आहे. शेतकऱ्यांची काय अडचण आहे, हे मला चांगलं माहित आहे, जाणीव आहे. त्यामुळे कोणी वेगवेगळे प्रचार करतील, मोठमोठ्या सभेतून आरोप करतील, काय झालं पिक विम्याचे ? असं म्हणतील मात्र तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. असंही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

1998 ला जर कोणी पिक विमा बाबत सांगितले असेल तर अटलजींच्या समोर माझे वडील स्वर्गीय पंडित आण्णा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समोर पिक विमा बाबत सांगितलं होतं. आणि त्यानंतर पिक विमा लागू झाला. एवढंच नाही तर मोझ्याक बाबतीत पंचनामे झालेत. त्यामुळे यावर देखील अंतिम निर्णय येणाऱ्या कॅबिनेटमध्ये होणार आहे, असं धनंजय मुंडे म्हणालेत.

Dhananjay Munde News
Pune Crime: फुकट दारुसाठी दादागिरी, मद्यधुंद एक्साइज अधिकाऱ्याकडून हॉटेल मॅनेजरसह वेटरला मारहाण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com