Vinod Tawde Money Distribution: विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. राज्यातील वातावरण चांगेलच तापलेले दिसत आहे. विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि विनोद तावडे यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विरार पूर्वच्या विवांत हॉटेलमध्ये हा राडा झाला. अशामध्ये हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्याव खळबळजनक आरोप केले आहेत. 'विनोद तावडे ५ कोटी घेऊन आले होते. त्यांना २५ वेळा फोन करून माफी मागितली.' असे वक्तव्य हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.
बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, 'विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन आले होते. पोलिस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा दोन डायऱ्याही सापडल्या. त्या डायरीमध्ये १५ कोटींची नोंद होती. ' तसंच, 'विनोद तावडे सांगतात की, तिकडे बैठक सुरु होती. पण मतदानाच्या ४८ तासआधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात. असे असताना भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला याची माहिती नाही का, ऐवढी अक्कल विनोद तावडेंना नाही का? असा सवाल हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
विनोद तावडे याठिकाणी लोकांना वाटण्यासाठी १५ कोटी रुपये घेऊन आले होते. आता पोलिस याप्रकरणात काय कारवाई करणार हे पहावे लागेल. सरकार त्यांचेच आहे त्यामुळे पुढे काही होणार नाही, असेही हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. या घटनेवरून विरारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरार पूर्वेकडील वितांत हॉटेलमधील राड्याचे आणि विनोद तावडे त्याठिकाणी बसले असल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.