Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून स्वबळाची तयारी, प्लॅन A आणि प्लॅन B तयार? मविआचं फिसकटलं?
Uddhav ThackeraySaam Tv

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून स्वबळाची तयारी, प्लॅन A आणि प्लॅन B तयार? मविआचं फिसकटलं?

Maha Vikas Aghadi On Seat Sharing: काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये विदर्भ, नागपूर आणि सांगोल्याच्या जागेवरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत.
Published on

Maharashtra Assembly Election: विधानसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू असल्याची चर्चा होत आहे. महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये विदर्भ, नागपूर आणि सांगोल्याच्या जागेवरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. अशामध्ये आता महाविकास आघाडीमधून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वच जागांसाठी ठाकरे गटाने तयारी केली असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वादामुळे आता शिवसेना ठाकरे गटाने सर्वच जागा लढवण्याची तयारी केली आहे. विधानसभेच्या सर्वच जागांसाठी ठाकरे गटाने बैठका करून आपली तयारी केल्याची सूत्रांची माहिती आहे. जागावाटपावरून काँग्रेससोबत वैचारिक मतभेद असल्यामुळे ठाकरे गटाचा प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार आहे. आले तर सोबत नाहीतर शिवाय असं विधानसभेला आक्रमक रित्या सामोरे जाण्याची ठाकरे गटाची रणनीती आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून स्वबळाची तयारी, प्लॅन A आणि प्लॅन B तयार? मविआचं फिसकटलं?
Maharashtra Politics : ठाकरे-काँग्रेसचा वाद पवारांनी मिटवला, जागावाटपावर एकमत, याद्या जाहीर होणार!

तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेमुळे काँग्रेसनेही स्वबळाची तयारी सुरु केलीची माहिती समोर आली आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांची भाजपसोबत जवळकी वाढली आहे. संजय राऊत आणि अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट झाली. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचीही भेट झाल्याच दावा काँग्रेसच्या सूत्रांनी केला आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंकडून स्वबळाची तयारी, प्लॅन A आणि प्लॅन B तयार? मविआचं फिसकटलं?
Maharashtra Politics : विधानसभेला मनोज जरांगेंनी डाव टाकला, लढायचं अन् पाडायचं; सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com