Maharashtra Politics : विधानसभेला मनोज जरांगेंनी डाव टाकला, लढायचं अन् पाडायचं; सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली

Vidhan Sabha Election : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वात मोठी घोषणा केली.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Saam Tv
Published On

Manoj Jarange Vidhan Sabha Election : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वात मोठी घोषणा केली आहे. विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पाहूया जरांगेची रणनिती कशी असणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे की लढवायचे याचा निर्णय घेण्यासाठी अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक पार पडली. बैठकीतून मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. सर्व इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना जरांगेंनी दिल्यात. तसंच जिथे आपल्या विचाराचा उमेदवार असेल त्याला पाठिंबा देणार असं जरांगेंनी जाहीर केलंय. 29 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याबाबत ठरेल असं जरांगेंनी जाहीर केलंय. समीकरण न जुळल्यास उमेदवार पाडायचे असं जरांगेंनी म्हटलंय.

जरांगेंनी अंतरवालीतील दोन दिवसांच्या मंथनात तीन निकष जाहीर केले आहेत. ज्या मतदारसंघातून उमेदवार निवडून येण्याची शक्यता असेल, त्याच जागेवर उमेदवार द्यायचा हा निवडणुकीसाठी पहिला निकष आहे. राज्यात जो मतदारसंघ राखीव आहे. त्या जागेसाठी उमेदवार देणार नाही. तिसरा निकष जिथे उमेदवार उभा केला जाणार नाही, तिथे उभ्या राहिलेल्या उमेदवाराकडून 500 रुपयांच्या बाँडवर लिहून घेतले जाणार आहे. जो मराठा आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन देईल, त्यालाच मतदान करायचं आहे.

दुसरीकडे जरांगे यांनी मौलाना सज्जाद नेमानी यांची भेट घेतलीये...संभाजीनगरात मध्यरात्री ही भेट झालीये. दोघांमध्येही जवळपास दोन तास चर्चा झालीये.अलिकडेच एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनीही जरांगेंची भेट घेतली होती. भविष्यात काहीही होऊ शकतं, असा सूचक इशाराही जरांगेंनी दिलाय. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर महायुतीला मराठवाड्यात महागात पडला होता. आता विधानसभेला जरांगेंनी थेट निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे राजकीय समिकरणे बदलणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com