Maharashtra Politics : ठाकरे-काँग्रेसचा वाद पवारांनी मिटवला, जागावाटपावर एकमत, याद्या जाहीर होणार!

Maharashtra Vidhan Sabha Election : ठाकरे-काँग्रेस वादात शरद पवार यांची मध्यस्थी सकारात्मक झाली असून मविआचं जागावाटप आज संध्याकाळी किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Election
Published On

Maharashtra Assembly Elections : काँग्रेस आणि ठाकरे यांच्यातील वाद मिटवण्यात शरद पवारांना यश आल्याचं समोर आले आहे. जागावाटपावरुन काँग्रेस आणि ठाकरे यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. दिल्लीमध्ये हा वाद पोहचला होता. ठाकरेंबद्दल काँग्रेसकडून दिल्लीत तक्रारीचा पाढा वाचण्यात आला होता. तर मातोश्रीवर ठाकरेंनी आमदारांना एकत्र बोलवत टोकाची भूमिका घेण्याची तयारी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी फोनाफोनी करत या वादाला पूर्णविराम दिलाय. ठाकरे-काँग्रेस यांच्यातील वाद शरद पवारांना मिटवण्यात यश आलेय. मंगळवारी मविआची पत्रकार परिषद होणार आहे, त्यामध्ये जागावाटपाच्या फॉर्म्यूल्यावर शिक्कामोर्तब होईल.

Maharashtra Vidhan Sabha Election
Congress Shiv Sena Clash : ठाकरेंची तक्रार दिल्लीत, काँग्रेसच्या बैठकीत काय झालं? वाचा इनसाइड स्टोरी

ठाकरे गटाचा नानांच्या भाषेवर आक्षेप

मविआच्या नेत्यांचं काल रात्रीपर्यंत मुंबईत बैठकांचं सत्र सुरु होतं. काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपावरून वाद असले तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जागा वाटपातील चर्चेतील भाषा हे देखील एक कारण असल्याची माहिती मिळाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बैठकांमध्ये सौम्य भाषेत चर्चा करत नाहीत. नाना पटोले एकेरी भाषेचा वापर करतात, असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला.

पवारांची मध्यस्थी यशस्वी -

रविवारी आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी याबाबत चर्चा केल्याची माहिती मिळाली. यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी भूमिका घेत आपापसात वाद न घालता हायकमांडने या जागांवर लक्ष घालावा असा निर्णय घेतलाय. या सगळ्यात वादात शरद पवार यांनी मध्यस्थी करावी असं ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांकडून विनंती करण्यात आली. यानंतर शरद पवार यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली.

Maharashtra Vidhan Sabha Election
Video: ठाकरे गट वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत? तिकडे आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीला

पाटील ठाकरेंकडे मेसेज घेऊन गेले -

संध्याकाळी शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांडसोबत झालेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी जयंत पाटील यांना मातोश्रीवर पाठवलं. शरद पवार यांची मध्यस्थी सकारात्मक झाली असून मविआचं जागावाटप आज संध्याकाळी किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com