Maharashtra Election 2024 Congress Uddhav Thackeray Shiv Sena UBT Seat Sharing Clash in Vidarbh : महायुतीच्या नाराजी नाट्याच्या बातम्यांनी रविवारचा दिवस गाजवला. जागावाटपावरुन काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आमनेसामने आल्याचे समोर आलेय. आता हा वाद दिल्लीपर्यंत पोहचलाय. काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेविषयी दिल्लीमध्ये नाराजी व्यक्त केली. रविवारी रात्री काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीतील इनसाईड स्टोरी साम tv ला समजली आहे. या बैठकीत काय काय झालं?
शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेवर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीमधील बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून जागावाटपात सहकार्य केलं जातं नसल्याचा सूर काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचा होता. "काहीही करा मात्र विदर्भातील त्या 12 जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडू नका" असेही राज्यातीन नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे मागणी केली. शिवसेना ठाकरे गट नेहमी काँग्रेसच्याच जागा का मागतो ? आघाडीतील दुसऱ्या मित्रपक्षाच्या जागेवर मात्र त्यांचा दावा नसतो असेही काँग्रेस नेत्यांनी बैठकीत विधान केलेय.
लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसच राज्यातील केडार सक्रिय झालं असून अनेक जागांवर काँग्रेस उमेदवार निवडून येऊ शकतो, त्यामुळे त्या जागांबाबत झुकत माप घेऊ नका. शिवसेना ठाकरे गटाची भूमिका ही सांगलीच्या जागेसारखीच आहे, त्यामुळं यावावर वरिष्ठांनी विचार करावा, असे बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते या जागांबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आज काँग्रेसच्या दिल्लीत 2 महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. आजच्या बैठकीत काँग्रेस उमेदवारांच्या अनेक नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. बाकी असलेल्या जागांवर उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेस पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीची सकाळी 10 वाजता हिमाचल भवन या ठिकाणी बैठक होणार आहे. कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. बैठकीसाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेनीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील उपस्थित असतील.
मागच्या बैठकीत 84 जागांवर चर्चा करून 62 जागांवर शिक्कामोर्तब केलं होतं. तर आजच सायंकाळी 5 वाजता काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) ची बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, मुकुल वासनिक यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते बैठकीला उपस्थित असतील. CEC च्या बैठकीत मतदारसंघ निहाय उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. CEC बैठकीनंतर आज रात्री उशिरा किंवा उद्या काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.