Maharashtra Vidhan Sabha Election: विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला; शिवसेना ठाकरे गटाला किती जागा मिळणार?

Maha Vikas Aghadi Seat Sharing For Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीला अजून ४ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, त्यापूर्वी तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून महाविकास आघाडीने जागावाटपाबाबत बोलणी सुरू केली आहे.
Maharashtra Politics: विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला; शिवसेना ठाकरे गटाला किती जागा मिळणार?
Maha Vikas Aghadi Leader Uddhav Thackeray, Sharad Pawar, Rahul GandhiSaam TV
Published On

लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्यानंतर आता महाविकास आघाडीने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. संयुक्त पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांकडून जागावाटपाची चाचपणी केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस १०० ते १०५ जागा लढवणार असल्याची माहिती आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्षाने ९० ते ९५ जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ८० ते ८५ जागा लढवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

विधानसभा निवडणुकीला अजून ४ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, त्यापूर्वी निवडणुकीच्या तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून महाविकास आघाडीने जागावाटपाबाबत बोलणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर शनिवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती.

या पत्रकार परिषदेपूर्वी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जागावाटपाची प्राथामिक बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. तिन्ही पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त कोणत्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद आहे, याची चाचपणी करण्यात येऊन उमेदवाराबाबत निर्णय घेतला जाईल, असं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं.

Maharashtra Politics: विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला; शिवसेना ठाकरे गटाला किती जागा मिळणार?
Maharashtra Politics : शिवसेनेचा पराभव करणं नारायण राणेंना कधीच जमणार नाही; ठाकरे गटाचा हल्लाबोल

सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या विभागात काँग्रेसची जास्त ताकद आहे. त्या विभागात त्यांना सर्वाधिक जागा दिल्या जातील. तर ज्या विभागात शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे, त्या विभागात त्यांना जागा सोडल्या जातील. असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाबाबतही असेल.

सध्या विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात काँग्रेसची ताकद जास्त असल्याने त्यांना इथे सर्वाधिक जागा मिळतील. कोकणासह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही भागात उद्धव ठाकरेंची मोठी ताकद असल्याने या विभागात त्यांना सर्वाधिक जागा मिळतील. शरद पवार गटाची पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत ताकद असल्याने त्यांना तिथल्या जागा दिल्या जातील.

Maharashtra Politics: विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला; शिवसेना ठाकरे गटाला किती जागा मिळणार?
Konkan Politics: कोकणात भाजप-शिंदे गटात शितयुद्ध, राणे-सामंतांचं बॅनर वॉर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com