Maharashtra politics Lok sabha Upcomeing Election Eknath shinde Group Big Loss Uddhav Thackeray profit
Maharashtra politics Lok sabha Upcomeing Election Eknath shinde Group Big Loss Uddhav Thackeray profitSaam Tv

Maharashtra Politics: महाराष्ट्रात शिंदे गटाला सर्वात मोठा फटका; ठाकरेंना किती जागा मिळणार? सर्व्हे काय सांगतो?

Maharashtra Lok Sabha Election Survey: सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्यास शिंदे गटाला या निवडणुकीत मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे. ठाकरे गटाला चांगल्या जागा मिळणार आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024 Survey: आगामी लोकसभा 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे सी व्होटरने सर्व्हे जारी केला आहे. या सर्व्हेनुसार, देशात आता निवडणुका झाल्यास देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचंच सरकार येणार असल्याचं समोर आलं आहे. पण विरोधकांच्या इंडिया आघाडीला सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा मिळणार आहे. महाराष्ट्रात शिंदे गटासह भाजपला मोठा फटका बसणार असल्याचं दिसून येत आहे. (Latest Marathi News)

Maharashtra politics Lok sabha Upcomeing Election Eknath shinde Group Big Loss Uddhav Thackeray profit
Maharashtra Politics: शरद पवार आणि अजितदादा पुन्हा एकत्र येणार? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरस ठरणार असून महायुतीला चांगली कामगिरी करता येणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिंदे गटाला (Eknath Shinde) या निवडणुकीत मोठा फटका बसणार असल्याचं सर्व्हेतून दिसून येत आहे. या सर्व्हेनुसार निकाल आले तर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंडिया टुडे सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, देशात एनडीएला 306 तर इंडिया आघाडीला 193 जागा मिळणार आहेत. म्हणजे इंडिया आघाडी मोठी झेप घेताना दिसत आहे. तर इतरांना 44 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, हा सर्व्हे आताचा आहे. निवडणुकांना अजून वर्ष बाकी आहे. तोपर्यंत मतदारांचा कल अजूनही बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Maharashtra politics Lok sabha Upcomeing Election Eknath shinde Group Big Loss Uddhav Thackeray profit
Maharashtra Politics: १६ आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे गटाकडून वेळकाढूपणा? ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा

दरम्यान, सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्यास महाविकासआघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर महायुती सरकारला चांगली कामगिरी करता येणार नसल्याचं दिसून येत आहे. आज लोकसभा निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला 28 तर महायुतीला 20 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात शिंदे गटाला मोठा फटका बसणार

विशेष बाब म्हणजे सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या शिंदे गटाला या निवडणुकीत मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे. शिंदे गटाकडे सध्या 13 खासदार आहेत. पण सर्व्हेनुसार शिंदे गट आणि अजितदादा गटाचे मिळून फक्त 5 खासदार निवडून येणार असल्याचा अंदाज आहे. भाजपला सर्वाधिक 15 जागा, काँग्रेसला 10 तर ठाकरे आणि शरद पवार गटाच्या मिळून 18 जागा निवडून येणार असल्याचं दिसून येत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com