Maharashtra Politics: काहीही करा, पण अजितदादांना अर्थ खातं देऊ नका; शिंदे गटातील आमदारांची भूमिका?

Eknath Shinde Group vs Ajit Pawar: अजित पवार यांना भाजपने युती सरकारमध्ये सामील करून घेतल्यानंतर शिंदे गटातील आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली असल्याची माहिती आहे.
Eknath Shinde Group vs Ajit Pawar
Eknath Shinde Group vs Ajit PawarSaam TV
Published On: 

Eknath Shinde Group vs Ajit Pawar: राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवार राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली. आता लवकरच या नवीन मंत्र्यांचं खातेवाटप होणार आहे, अशातच शिंदे गटाने (CM Eknath Shinde) खातेवाटपावरून नाराजी दर्शवली असल्याची चर्चा आहे.

Eknath Shinde Group vs Ajit Pawar
Amol Kolhe News: अजित पवारांच्या शपथविधीनंतर अमोल कोल्हेंची मोठी घोषणा; थेट खासदारकीचा राजीनामा देणार

अजित पवार (Ajit Pawar) यांना भाजपने युती सरकारमध्ये सामील करून घेतल्यानंतर शिंदे गटातील आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली असल्याची माहिती आहे. कारण, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांच्या शपथविधीमुळे शिंदे गटातील अनेक भावी मंत्र्यांचा पत्ता कट झाल्याचं सांगण्यात येत आहे.

आता अजित पवार यांना मंत्रिपदाचं खात देत असताना काहीही करा, पण अजितदादांना अर्थ हे खातं देऊ नका, अशी भूमिका शिंदे गटातील आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

Eknath Shinde Group vs Ajit Pawar
Maharashtra Politics: अजितदादांच्या शपथविधीनंतर शिंदे गटात धुसफूस वाढली; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

शिंदे-भाजप युतीमध्ये सामील झालेले अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. त्यावेळी शिवसेनेच्या बऱ्याच आमदारांनी अजित पवार हे फक्त राष्ट्रवादीच्याच आमदारांना जास्त निधी देतात, शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी देत नाहीत, अशा स्वरूपाच्या तक्रारी केल्या होत्या.

विशेष बाब म्हणजे, शिवसेनेतून बाहेर पडताना शिंदे गटातील आमदारांनी आपण याच कारणामुळे बाहेर पडत असल्याचं सांगितलं होतं. अजित पवार निधीबाबत दुजाभाव करत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आमदारांनी केला होता. आता युती सरकारमध्ये आल्यानंतर अजित पवारांकडे अर्थ खातं देऊ नका, अशी मागणी शिंदे गटातील आमदारांनी केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.