Maharashtra Politics: अजितदादांच्या शपथविधीनंतर शिंदे गटात धुसफूस वाढली; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

Ajit Pawar's Entry In Government: अजित पवार सत्तेत येऊन दोन दिवस पूर्ण होत नाही तेवढ्यात शिंदे गटात धुसफूस सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar, eknath shinde
Ajit Pawar, eknath shindesaam tv
Published On

Maharashtra Political News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पक्षातून बंड करत शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या ८ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सरकारमध्ये (Maharashtra Politics) स्वागत करत असताना दुसरीकडे शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Ajit Pawar, eknath shinde
Amol Kolhe News: अजित पवारांच्या शपथविधीनंतर अमोल कोल्हेंची मोठी घोषणा; थेट खासदारकीचा राजीनामा देणार

 अजित पवार (Ajit Pawar)सत्तेत येऊन दोन दिवस पूर्ण होत नाही तेवढ्यात शिंदे गटात धुसफूस सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारमध्ये घेऊन मंत्रिपदं दिल्याने शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजीची असल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून (Shivsena) बंड केल्यानंतर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकारमध्ये राहायचं नव्हतं, बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण नाही, असं म्हणत शिंदे गटातील आमदारांनी आतापर्यंत हिंदुत्वाचा दाखला दिला.

त्यामुळे ज्यांच्याविरोधात आपण आतापर्यंत बोललो त्यांच्यासोबतच आता सत्तेत कसं बसायचं? असा प्रश्नही शिंदे गटातील काही नेत्यांना पडला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता मोठी खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातील, अशी धाकधूक शिंदे गटाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Ajit Pawar, eknath shinde
Saamana On Samruddhi Mahamarg Accident: अपघातांचे प्रमाण समृद्धी महामार्गावर जास्त का? सामनातून संतप्त सवाल; CM शिंदेंवर केला गंभीर आरोप

दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सात नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असेलेले दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांचाही समावेश आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्याआधीच मंत्रिपद मिळाल्याने शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाची मुंबई बैठक पार पडली या बैठकीत हा आमदारांनी नाराजीचा सूर दर्शवला असल्याची माहिती आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com