मुंबईमध्ये आज एमआयएम पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई प्रदेश अध्यक्ष बदलण्यात आला. मुंबई अध्यक्ष फैयाज अहमद यांना पदावरून हटवले. त्यानंतर फैयाज यांच्या समर्थकांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये राडा केला. त्यामुळे दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. हा राडा कॅमेऱ्यात कैद झालाय. माजी खासदार इम्तियाज जलील त्यावेळी उपस्थित होते.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण त्याआधीच एमआयएमचे कार्यकर्ते भिडले. त्यामुळे तणावाचे वातावरण झाले होते. एमआयएमचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. इम्तियाज जलील यांच्यासमोरच राडा झाला, पण ते काहीच बोलले नाहीत, त्याचाही राजकीय चर्चा सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.