Maharashtra Politics: भाजपला मोठा धक्का, पिंपरी चिंचवडचा मोठा नेता ठाकरेंच्या गळाला, राजकीय गणित बदलणार!

Pimpri-Chinchwad politics: रवी लांडगे यांची राजकीय पार्श्वभूमी जुनीच आहे. त्यांचे चुलते आणि वडील हेही राजकारणात सक्रीय होते.
Devendra Fadanvis Uddhav Thackeray
Devendra Fadanvis Uddhav ThackeraySaam TV
Published On

Maharashtra Politics: राज्यातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत, पण त्याआधीच राज्यातील राजकीय समीकरणं बदलू लागली आहे. विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेते पक्षांतर करत आहेत. विरोधकांना याचा अनेकदा फटका बसल्याचे आपण पाहतो, पण पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad politics) सत्ताधारी भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी लांडगे यांनी भाजपला (Ravi Landge) रामराम ठोकला आहे. आता ते उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. २० ऑगस्ट रोजी मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं समजतेय.

रवी लांडगे यांची राजकीय पार्श्वभूमी जुनीच आहे. त्यांचे चुलते आणि वडील हेही राजकारणात सक्रीय होते. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत त्यांनी महत्वाचे पदे भूषावली आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे,त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय. पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र रवी लांडगे यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी भाजपला रामराम ठोकलाय.

Devendra Fadanvis Uddhav Thackeray
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली; एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा आरोप

रवी लांडगे उद्या मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी भाजप रुजवली. महापालिकेत भाजपचे दोन अंकी नगरसेवक निवडून आणले. लांडगे घराण्याचा राजकीय वारस म्हणून रवी लांडगे पुढे आले.

Devendra Fadanvis Uddhav Thackeray
Maharashtra Politics: आधी मिटकरींनी फडणवीसांकडे खुलासा मागितला, आता भाजप नेत्याने पात्रता काढली, महायुतीत नेमकं चाललंय काय?

2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत रवी लांडगे हे भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

रवी लांडगे व त्यांचे कुटुंबीय हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने निष्ठावान म्हणून ओळखले जातात.

उद्या मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता रवी लांडगे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com