Maharashtra Politics : आधी रामदास कदम बरसले, मग रवींद्र चव्हाण संतापले; आता फडणवीस म्हणाले शिंदेंसोबत बोलतो

Maharashtra Politics : आमची मनं दुखावली, शिंदेंसोबत बोलणार, कदमांच्या तिखट वक्तव्यानंतर फडणवीसांचा पारा चढला
Maharashtra Politics
Maharashtra Politics
Published On

Devendra Fadnavis on Ramdas Kadam : रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह समोर आला आहे. रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यानंतर प्रत्युत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनीही जोरदार टीका केली. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमची मने दुखावली आहेत, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बोलणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

रामदास कदम यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आशा प्रकारचे आरोप कुठल्याही युती धर्मात बसत नाहीत. भाजपला वेठीस धरणं योग्य नाही. त्यांचं म्हणणं जाणून घेऊयात. पण

असं वारंवार टोकाचं ते बोलतात, त्यामुळे आमची मनं दुखावली जातात. आम्हीही बोलू शकतो, वारंवार असं बोलणं मला मान्य नाही. याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Maharashtra Politics
Assembly Election: महायुतीत तेढ? आंबेगाव विधानसभा मतदारसंघात जागेसाठी रस्सीखेच; वळसे-पाटील यांच्यानंतर शिवसेनेचा दावा

प्रवीण दरेकर काय म्हणाले ?

महायुतीत सारे अलबेल आहे. आणखी अलबेल राहण्यासाठी जबाबदार नेत्यांना जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी जेष्ठत्वासारखं बोललं पाहिजे. बालिशपणाचे वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित नाही. महायुती टिकण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी जबाबदारीने आणि संयमानं बोललं पाहिजे. भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीची ताकद देशात आणि महाराष्ट्रात आहे. जो मोठा असतो ताकदवर असतो तो नेहमी संयमी असतो. ज्याच्या मनगटात ताकद नसते त्याला आव आणून दाखवावा लागतो मी ताकदवर आहे, असा टोला दरेकरांनी रामदास कदम यांना लगावला.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : 'मी सौजन्य सोडलं तर, वाईट...' रविंद्र चव्हाण रामदास कदम यांच्यावर संतापले; भाजप- शिंदे गटात जोरदार जुंपली!

कृपाल तुमाणे काय म्हणाले ?

महायुती म्हणून निवडणूर लढवून भगवा फडकवू, शिंदे आणि फडणवीस यांची याबाबत बैठक होईल, त्यामधून योग्य तो मार्ग निघेल. पण कुणा एकटच्या म्हणण्याने महायुती तुटणार नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहोत, ते म्हणतील तो आमचाही निर्णय असेल, असे आमदार कृपाल तुमाणे म्हणाले.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: मेंटल, कुत्रा, युती... रामदास कदमांची जीभ पुन्हा घसरली, रवींद्र चव्हाणांवर बरसले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com