मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेनंतर भाजप आमदार आक्रमक झाले. मनोज जरांगे यांची वक्तव्ये आणि हिंसक आंदोलनाची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदारांकडून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या मागणीनंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधत खळबळजनक आरोप केला आहे. मनोज जरांगे फक्त निमित्त असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच भाजपचे टार्गेट असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी (ता. २८) यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना पटोले म्हणाले, "महायुतीत जागा वाटपावरुन अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देऊन भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच टार्गेट केलंय". (Latest Marathi News)
"मनोज जरांगे अंतरवाली सराटीत उपोषण करत असताना मुख्यमंत्री शिंदे त्यांना जाऊन भेटले होते. त्यानंतर नवी मुंबईत जरांगेंचे उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांचा एक OSD सतत जरांगेच्या संपर्कात होता. जरांगे पाटील हे फक्त निमित्त असून भाजपचे खरे टार्गेट तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देताच, ओबीसी नेते बबनराव तायवाडे जरांगे यांच्या मदतीसाठी धावले आहेत. जरांगे यांची वक्तव्य चुकीचे असून मी त्यांचा निषेधच केला आहे. पण शब्दप्रयोग एसआयटी चौकशी लावण्याइतके होते का? मी एसआयटीचे सुद्धा समर्थन करणार नाही, असं तायवाडे यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.