राखीव जागांवर निवडून आलेल्या नगरसेवकांना दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ, शेवटची तारीख काय?

corporator caste certificate issue : महापालिकेत राखीव जागांवर निवडून आलेल्या नगरसेवकांना दिलासा मिळालाय. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.
corporator caste validity  certificate
bmc Saam tv
Published On
Summary

पालिकेत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना दिलासा

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढ

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना मोठा दिलासा मिळाला आहे. या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची अंतिम मुदत वाढ मिळणार आहे. यासाठी अधिनियमात तशी सुधारणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या लोकप्रतिनिधींना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

corporator caste validity  certificate
Maharashtra Cabinet Meeting: फडणवीस सरकारचे ६ मोठे निर्णय, कोणत्या जिल्ह्यांना होणार सर्वाधिक फायदा?

जात पडताळणी समित्यांकडील अपुरे मनुष्यबळ, जनगणनेच्या कामकाजासाठी शासकीय, निमशासकीय शाळांतील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे अनेक प्रकरणांमध्ये आवश्यक शालेय व गृह चौकशी वेळेत पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. राखीव जागांवरून निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यात विलंब होत आहे.

शासनाने ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सन २०२५-२६ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांना आणखी सहा महिन्यांची आणि अंतिम मुदत वाढ देण्यात येणार आहे.

corporator caste validity  certificate
नॉन क्रिमीलेअर मर्यादा १५ लाख होणार? महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक, CM फडणवीस काय निर्णय घेणार?

त्यासाठी संबंधित मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यास तसेच याबाबत राज्यपाल महोदयांच्या मान्यतेने अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com