
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले.
मुख्यमंत्र्यांनी आंदोलनावर टीका करत जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केल्याचे म्हटले.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिले.
त्यांनी सरकारला संयमाने चर्चा करून तोडगा काढण्याचे आवाहन केले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर ते आमरण उपोषणाला बसले. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी आझाद मैदान परिसरात मोठी गर्दी केली आहे. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जातंय', अशी टीका विरोधकांवर केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलंय.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देत महाराष्ट्र सरकारवरच निशाणा साधला. ते म्हणाले की, 'मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस आपल्या न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेला आहे. मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचे काम नाही. जर कोणी हे न्यायालयाच्या हवाले देत असतील हे सरकारचं काम आहे. हे राज्याच्या गृह खात्याचे काम आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्याचे काम आहे.
जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जातंय या मुख्यमंत्र्यांच्या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर देताना सांगितले की, 'मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अप्रत्यक्षपणे कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहे. एक समाज आपल्या न्याय मागण्यासाठी महाराष्ट्राच्या राजधानीत आला असेल त्यांना त्यामध्ये राजकारण काय दिसत आहे. आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा सत्तेवर आला आहात तेव्हा आपण या प्रश्नांना चालना दिली किंवा त्या माध्यमातून राजकारण तुम्ही केलं. मिस्टर फडणवीस आणि तुम्हाला आता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण कोण करत असेल. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात जनतेला विश्वासात घेऊन सांगा राजकारण करणारे कोण तुमच्या सरकारमध्ये आहेत, विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेटमध्ये आहेत.'
सरकारने जरांगेंच्या मागण्यांवर गांभिर्याने विचार करावे असे म्हणत संजय राऊत म्हणाले की, ' मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने मराठा समाजाचे लोक आले हे सत्य म्हणून जरांगे पाटील हे आझाद मैदानात पोहचल्याची माहिती आताच घेतली. मुंबईत सगळ्यात मोठा गणपती उत्सव आहे. मला विश्वास आहे हे सगळे आमचे बांधव कोणत्याही प्रकारे गणेश उत्सवाला डिस्टर्ब न करता त्यांचे आंदोलन करतील. सरकारने या राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटत आहे भडका उडेल. कारण मनोज जारंगे पाटील हा दबावाखाली येणारा माणूस नाही आणि त्याने आमरण उपोषणाची धमकी दिली आहे. त्याच्यामुळे सरकारने अत्यंत संयमाने या विषयावर चर्चा करून मार्ग काढून ही समस्या सोडवली पाहिजे. मी त्याला समस्या न बोलता असं बोलेल मागण्यांवर गांभीर्याने विचार केला पाहिजे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.