Manoj Jarange : मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल! मनोज जरांगेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Mumbai News : मराठा समाजाचा निर्णायक एल्गार आज मुंबईतील आझाद मैदानावर धडकला आहे. ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्या आणि सग्यासोयऱ्यांचा जीआर तात्काळ काढा या प्रमुख मागण्यांसाठी हजारो मराठा बांधव एकवटले आहेत.
Manoj Jarange : मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल! मनोज जरांगेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन
Mumbai NewsSaam Tv
Published On
Summary
  • आझाद मैदानावर मराठा बांधवांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती

  • ओबीसी प्रवर्गातून आरक्षण व सग्यासोयऱ्यांचा जीआर ही प्रमुख मागणी

  • मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकले

  • सुरक्षेसाठी मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव आज आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल झालं आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मराठा बांधव एकवटणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, तसेच सग्यासोयऱ्यांचा जीआर तात्काळ काढण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

दोन वर्षांपूर्वी आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईत आलेल्या मराठ्यांना मुंबईच्या वेशीवरूनच परत जावं लागलं होत. मात्र आज मुंबईतील आझाद मैदानावर आज मराठ्यांचं भगवं वादळं धडकलं आहे. ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, तसेच सग्यासोयऱ्यांचा जीआर तात्काळ काढावा अशा प्रमुख मागण्यांसाठी मराठा समाज एल्गार करणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानावर एकवटले आहेत. मराठ्यांचं हे वादळ २७ ऑगस्ट रोजी आंतरवली सराटी येथून हजारोंच्या संख्येने निघालं होतं.

Manoj Jarange : मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल! मनोज जरांगेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन
Manoj Jarange: आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा ‘गनिमी कावा’

त्यानंतर काल म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी सकाळी जुन्नर येथे विश्रांती घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. आज हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मराठ्यांची फौज मुंबईत दाखल होताच फटक्यांची आतषबाजी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी कडेकोट व्यवस्था केली आहे. आझाद मैदान, आसपासचे प्रमुख रस्ते तसेच रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Manoj Jarange : मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल! मनोज जरांगेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन
Manoj Jarange: गोळ्या घाला तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा|VIDEO

वाहतुकीवरही परिणाम होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांची सोय करण्यात आली आहे. सरकारकडून कोणत्याही प्रकारची गडबड किंवा अनुचित घटना घडू नये म्हणून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान आज मराठ्यांच्या मागणीची पूर्तता होणार का ? दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या लढ्याला न्याय मिळणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच आज संध्याकाळपर्यंत सरकारची भूमिका स्पष्ट होईल आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला कोणता कलाटणीबिंदू मिळतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com